रशियाविरोधात तीव्र लढा, आता युक्रेनची गुप्त सेना रस्त्यावर उतरली

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध रशियाच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ चालले आहे. (Russia Ukraine Conflict) रशियन आर्मीच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. पण रशियाशी लढण्यासाठी आता युक्रेनची गुप्त सेनाच रस्त्यावर उतरली आहे. 

Updated: Feb 28, 2022, 01:56 PM IST
रशियाविरोधात तीव्र लढा, आता युक्रेनची गुप्त सेना रस्त्यावर उतरली title=

कीव : Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध रशियाच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ चालले आहे. (Russia Ukraine Conflict) रशियन आर्मीच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. पण रशियाशी लढण्यासाठी आता युक्रेनची गुप्त सेनाच (Ukrainian military) रस्त्यावर उतरली आहे. (Ukraine's president warns Intense fighting against Russia, now Ukraine's secret troops took to the streets)

रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर हे युद्ध एक ते दोन दिवसांत संपेल असा अंदाज लावला जात होता. पण रशिया युक्रेन यांच्यातले युद्ध अपेक्षेपेक्षा जास्त लांबले आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. पण रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसल्यावर त्यांना युक्रेनच्या फौजेप्रमाणेच युक्रेनच्या जनतेचाही सामना करावा लागत आहे. 

 रशियन फौजा शहरात घुसल्यावर...

युक्रेनच्या जनतेने आपल्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून रशियाचा सामना करायला सुरूवात केली आहे. रशियन फौजा शहरात घुसल्यावर त्यांचा मुकाबला करण्यासाठी जनतेने जागोजागी रस्ते खोदून बंकर उभे केलेत. युक्रेनच्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात रायफलींचे वाटप करण्यात आले आहे.

Ukraine imposes state of emergency, shuts airports as Russia attempts to seize control of its airspace

रायफली घेऊन हे सैनिक रशियन सैनिकांना रोखत आहेत. छोट्या छोट्या गावातूनही रशियन सैनिकांना कडवा प्रतिकार केला जात आहे. रशियन सैन्य अजूनही पूर्व युक्रेनमध्ये आहे. मध्य युक्रेनमध्ये रशियन शिरलेले नाहीत. या काळात इथल्या नागरिकांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 

रायफल चालवणे, लढणाऱ्या सैनिकांना मदत करणे, मदत साहित्य य़ुद्धजन्य स्थितीत सैनिकांपर्यंत पोहोचवणे, गावाची सुरक्षा करणे, शत्रूला एका जागी रोखून धरणे, जखमी सैनिकांना युद्धभूमीतून बाहेर आणणे, सैनिकांना झटपट हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे, प्रथमोपचार, इतर वैद्यकीय उपचार, असे मोठे प्रशिक्षण युक्रेनच्या नागरिकांचे पूर्ण झाले आहे. 

युक्रेनमधून सर्वच स्तरातून कडवा प्रतिकार

रशियाला युक्रेनमधून सर्वच स्तरातून कडवा प्रतिकार होत आहे. युक्रेनच्या सौंदर्यवती, टेनिसपटू यांनीही हाती बंदुका घेतल्या आहेत. रशियात गावागावात तरूण, आबालवृद्ध यांनी निकराची लढाई सुरू केली आहे. रशियाचे जवळपास साडेचार हजार सैनिक युक्रेनच्या भूमीत ठार मारण्यात आलेत. 

नागरिक निधड्या छातीने सामोरे 

याशिवाय रणगाडे, इतर चिलखती गाड्या यांना नागरिक निधड्या छातीने सामोरे जात आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी रणगाडेच जाळल्याचीही उदाहरणं आहेत. रशियन फौजांना हा कडवा प्रतिकार अपेक्षित नव्हता. त्यामुळेच नागरिकांची ही फौज रशियन सैनिकांना भारी पडतेय. युक्रेनी नागरिकांसाठी आता ही करो या मरोची लढाई आहे. अस्तित्वाचाच लढा लढणाऱ्या युक्रेनी जनतेचे इरादे यामुळेच मजबूत झाले आहेत.