Russia Ukraine Dirty Bomb : रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये (Russia Ukraine War) अण्वस्त्रांचा वापर होणार असल्याची भीती संपूर्ण जगाला असतानाच आता रशियानं युक्रेनवर गंभीर आरोप केल्याची बाब समोर आली आहे. बरं, हा डर्टी बॉम्ब वापरत रशियालाच अडचणीत आणत युद्धाला वेगळं वळण देण्याचा युक्रेनचा मनसुबा असल्याचं कळत आहे. पण, पाश्चिमात्य देशांनी मात्र ही बाब नाकारली. आतापर्यंत जगभरात कधीच 'डर्टी बॉम्ब'चा वापर करण्यात (Russia Ukraine Dirty Bomb) आलेला नाही, त्यामुळे यावेळी त्याचा वापर झाल्यास नेमके काय परिणाम असणार याचीच चर्चा सध्या सुरु आहे.
Dirty Bomb ला तांत्रिक शब्द काय, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर त्याचं उत्तर आहे रेडिओलॉजिक डिस्पर्सन डिवाईस (Radiological Dispersal Device). हे बॉम्ब सुरुवातीला फारसे घातक आणि लक्ष्यभेद करणारे नसतात. अणुबॉम्बच्या तुलनेत ते तयार करणं अतिशय किफायतशीर आणि तुलनेनं कमी नुकसानकारक असतं. यामध्ये डायनामाईट आणि तत्सम स्फोटकांचा वापर होतो.
Dirty Bomb मुळे होणारं नुकसान हे अनेक गोष्टींवर आधारित असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे स्फोटकांचं प्रमाण आणि प्रकार. रेडियोएक्टिव मटीरियलचं प्रमाण महत्त्वाचं असण्यासोबतच यामध्ये हवामानही महत्त्वाची भूमिका बजावतं. डर्टी बॉम्बमुळे खुप कमी लोकांचा मृत्यू होतो. मात्र, याचा मानसिक त्रास अनेकांना झाल्याचं दिसतं. ज्यावेळी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी या अस्त्राचा वापर केला जातो.
आणखी वाचा - Video: कोरोना रुग्ण घरात लपून बसला होता, प्रशासनानं क्रेननं खेचून काढलं बाहेर
दरम्यान, किरणोत्सर्गी धूळ आणि धूर दूरवर पसरू शकतात आणि स्फोटाच्या जागेच्या आसपासच्या लोकांना श्वास घेणं धोकादायक ठरू शकतं. किरणोत्सर्गी ढग दूरवर पसरू शकतात. वातावरणातून पसरणारे किरणोत्सर्गी पदार्थ कमी दाट आणि कमी हानिकारक असतात. त्यापासून बचाव देखील केला जाऊ शकतो.