कीव : Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला केलेल्या रशियाची 9 फायटर जेट्स गेल्या 24 तासांत पाडली, असा दावा युक्रेनने केला आहे. गेल्या 9 दिवसांत रशियाची 39 लढाऊ विमाने आणि 40 हेलिकॉप्टर्स पाडली, असा दावा युक्रेनने केला आहे. (Ukraine claims To fall 39 Russian fighter jets and 40 helicopters in 9 days)
रशियाच्या विमानांवर युक्रेनच्या विमान विरोधी तोफांनी मोठा मारा केला आहे. त्यात मोठे यश आल्याचा दावाही करण्यात येतोय. या व्यतिरिक्त युक्रेनच्या ड्रोन्सनी रशियाच्या रणगाडे आणि चिलखती गाड्यांवरही तुफान मारा केलाय. युद्ध सुरू होऊन 10 दिवस झालेत. युक्रेन मोठ्या त्वेशाने रशियन फौजांशी लढत आहे.
भारताने युद्ध थांबवण्यासाठी मदत करावी, अशी साद युक्रेनने भारताला पुन्हा घातली आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी युद्ध रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रयत्न करावे, अशी मदत मागितली आहे.
पंतप्रधान मोदींनी रशियन अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा करून युद्ध थांबवावं अशी विनंती कुलेबा यांनी केलीय. 'झी मीडिया'शी कुलेबा यांनी संवाद साधला. त्यात त्यांनी ही विनंती केली आहे. रशियाने तातडीने गोळीबार, बॉम्बफेक थांबवावी यासाठी भारताने मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.