पंतप्रधानांनी गुपचुप उरकलं लग्न, 23 वर्षांहून लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत केलं लग्न

2022 मध्ये लग्न करणार असल्याची रंगली होती चर्चा 

Updated: May 30, 2021, 10:43 AM IST
पंतप्रधानांनी गुपचुप उरकलं लग्न, 23 वर्षांहून लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत केलं लग्न  title=

मुंबई : पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगलेली असताना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जॉनसन यांनी कैरी साइमंड्ससोबत खासगीपद्धतीने लग्न केल्याचं कळलं आहे. या लग्नात दोघांचे अतिशय जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार होता. हे दोघं पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची चर्चा होती. 

वेडिंग कार्डमध्ये वेन्यूची नव्हती माहिती

मीडिया रिपोर्टनुसार, जॉनसन आणि साइमंड्स यांनी अतिशय खासगी पद्धतीने हा सोहळा पार पाडला आहे. 30 जुलै 2022 रोजी हे लग्न होणार असल्याची चर्चा रंगली होती. याकरता 56 वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि त्यांची 33 वर्षीय गर्लफ्रेंड कैरी साइमंड्स नातेवाईकांना आमंत्रण देत होते. मात्र यावर लग्नाचं स्थळ देण्यात आलं नव्हतं. 

2019 मध्ये जॉनसन पंतप्रधान झाल्यानंतर जॉनसन आणि साइमंडस डाऊनिंग स्ट्रीटमध्ये एकत्र होते. गेल्यावर्षी त्यांना एक मुलगा झाला आहे. मुलाचं नाव विल्फ्रेंड लॉरी निकोलस जॉनसन असं आहे. या अगोदर जॉनसन यांचं लग्न मरीना व्हीलरसोबत झालं होतं. या दोघांना चार मुलं आहे. 25 वर्षांच्या संसारानंतर सप्टेंबर 2018 साली हे दोघं वेगळे झाले. व्हीलरच्या अगोदर जॉनसन यांनी एलेग्रा मोस्टिन-ओवेनसोबत लग्न केलं होतं. साइमंड्स जॉनसन यांची तिसरी पत्नी आहे.