जेव्हा मृत्यूनंतर त्याच कुटूंबात होतो जुळ्या मुलींचा पुनर्जन्म, थरारक किस्सा वाचल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल

मागून भरधाव वेगात आलेल्या कारने दोन्ही बहिणींना धड़क दिली, अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Updated: Nov 10, 2022, 02:34 PM IST
जेव्हा मृत्यूनंतर त्याच कुटूंबात होतो जुळ्या मुलींचा पुनर्जन्म, थरारक किस्सा वाचल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल title=
twin sister rebirth in the same family after death read

Thrilling Story : आपण अनेक चित्रपटांमध्ये नायकाचा पुनर्जन्म झालेला पाहिल असेल. मात्र खऱ्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म झालाय असं कधी ऐकलंय का तुम्ही? जर एखाद्या व्यक्तीनं असे किस्से सांगितले, तरी तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र असा किस्सा प्रत्यक्षात घडलाय. ही गोष्ट ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा किस्सा ऐकल्यानंतर कदाचित तुम्हीही पुनर्जन्मांवर विश्वास ठेवायला सुरूवात करू शकता. (twin sister rebirt in the same family after death read )

नेमकं काय घडलेलं? 

5 मे 1957 साली इंग्लंडच्या हेक्सम(Hexham) मध्ये जोआना आणि जॅकलीन  (Joanne and Jacqueline) नावाच्या दोन बहिणी राहत होत्या. या दोघी बहिणी त्यांच्या अँथनी नावाच्या मित्रासोबत चर्चला जाण्यासाठी रस्त्यावरून पायी जात होत्या. त्यादरम्यान, मागून भरधाव वेगात आलेल्या कारने दोन्ही बहिणींना धड़क दिली, अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी जोआनाचं वय 11 वर्ष होतं आणि जॅकलीन 6 वर्षांची होती.

Day Of The Dead: मृतांच्या आत्म्यासोबत कुटुंबाचं सेलिब्रेशन; थरकाप उडवणारी विचित्र प्रथा तुम्हाला माहितीये?

अपघातात आपल्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचं कळाल्यानंतर आई फ्लोरेंस आणि वडिल जॉन पोलक (Florence john pollock) यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आपल्या दोन्ही मुलींचा मृत्यू झालाय यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. एक ना एक दिवस आपल्या दोन्ही मुली जोआना आणि जॅकलीन घरी परत येतील असा दावा जॉन पोलक यांनी केला होता. 

फ्लोरेंसने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आणि...

एक दिवस त्यांच्या मुली परत येतील याच्यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता. काही काळ उलटल्यानंतर 4 ऑक्टोबर 1958 रोजी फ्लोरेंसने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. त्याचं नाव जिलियन आणि जैनिफर असं ठेवलं. त्यानंतर काही विचित्र गोष्टी घडण्यास सुरूवात झाल्या. काही आठवडे होत नाही तर दोन्ही मुलींच्या शरीरावर काही विचित्र बर्थ मार्क दिसायला लागले. ते काही साधारण बर्थ मार्क नव्हते. या खुणा पाहून जणू काही दुखापतीच्या खुणा असल्यासारख्या वाटत होत्या. 

दोन्ही मुलींच्या शरीरावर विचित्र बर्थ मार्क

जॉन आणि फ्लोरेंसने मुलींच्या अंगावरच्या खुणा निरखून पाहिल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, जोआना आणि जॅकलीनच्या शरीरावरील तशाच्या तशा खुणा जिलियन आणि जैनिफरच्या अंगावर दिसत होत्या. जिलियनच्या माथ्यावर जखमेच्या खुणा दिसत होत्या. तशाच खुणा कार अपघातात जॅकलीनच्या माथ्यावर होत्या. तर अपघातामुळे जैनिफरच्या शरीरावर झालेल्या जखमांच्या खुणा जोआनाच्या शरीरावर दिसत होत्या. 

जुळ्या मुलींमध्ये जोआना-जॅकलीनसारख्या समानता

दोन्ही बहिणी मोठ्या होत होत्या तशा त्या जोआना जॅकलीनसारख्या दिसत होत्या. त्यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समान होत्या. लोकांना हे सगळं पाहून योगायोग असल्यासारखं वाटलं. मात्र दिवसेंदिवस आणखीनच विचित्र घटना घडायला सुरूवात झाली. जिलियन आणि जेनिफर काही महिन्यांच्या झाल्यानंतर त्यांचं कुटूंब विटली बे(Whitley bay)ला शिफ्ट झालं. मात्र चार वर्षानंतर पुन्हा हे कुटूंब हेक्सम (Hexham)ला शिफ्ट झालं. 

खेळण्यांची ओळख

कालांतराने अशा घटना घडू लागल्या की कुणीही पाहून चक्रावून जाईल.  जिलियन आणि जैनिफरला रस्त्यावर कुठलीही गाडी दिसली की त्या घाबरून जात होत्या. जोरजोरात ओरडत ती कार आम्हाला चिरडेल अशा म्हणत होत्या. एक दिवस जॉनने जुळ्या बहिणींना जोआना आणि जॅकलीनचे जुने खेळणे खेळायले दिले. जॉन आणि फ्लोरेंसने त्या दोघींना अपघातात मरण पावलेल्या बहिणींबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. मात्र तरीही त्या जुळ्या बहिणींनी जोआना आणि जॅकलीनने जी नाव खेळण्यांना ठेवली होती तिच नाव अचूक सांगितली. हे ऐकून जॉन आणि फ्लोरेंसला मोठा आश्चर्याचा धक्का बसला.

शहरातील ठिकाणं आणि रस्त्यांची ओळख

जोआना आणि जॅकलीन ज्या शाळेत जात होत्या त्या शाळेचं नाव सुद्धा जुळ्या बहिणींना माहिती होती. त्यांना हेक्सम शहरातील बरेच लँडमार्क माहिती होते. दोघी मुली अनेकदा रस्त्याने चालत असताना त्यांना कोणीतरी धडकले, असे वर्तन करायचे. त्यांच्याकडून बघून असं वाटायचं की त्या अपघाताच वर्णन करतायेत. 

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, डॉ. इयान स्टीवन्सन यांनी या जुळ्या बहिणींवर केस स्टडी केली. यासंदर्भात त्यांच्या आईवडिलांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर या घटनेवर आधारित 'Reincarnation And Biology' नावाचं पुस्तक ही लिहिलं होतं. मात्र त्यानंतर जिलियन आणि जेनिफर जसजसे मोठे होत गेले, तसं आयुष्य पूर्वपदावर येत गेलं. त्यांच्या अंगावरच्या खुणा पुसट होत गेल्या. मात्र या दोघी जुळ्या बहिणींना अजूनही कार अपघाताचे स्वप्न पडतात. आता त्या 64 वर्षांच्या झाल्या आहेत. सध्या दोघी जणी आनंदात आयुष्य जगतायेत.