रुबाबदार! भररस्त्यात सिंहिणींचा स्टायलिश वॉक, विस्मयकारक Video

Lions Video : हा विस्मयकारक व्हिडीओ पाहून तुमचा दिवस बनेल.

Updated: Oct 3, 2022, 01:35 PM IST
रुबाबदार! भररस्त्यात सिंहिणींचा स्टायलिश वॉक, विस्मयकारक Video title=
trending videoThree lionesses walking in the road nmp

Lionesses Video : सिंहाला (Lione ) जंगलाचा राजा (king of the jungle) म्हटलं जातं. तर सिंहिणी ही जंगलाची राणी...सोशल मीडियावर (Social media) वाईल्ड लाईफचे (Wild life) अनेक व्हिडीओ (Video) खूप पाहिल्या मिळतात. असाच एक सिंहिणींचा व्हिडीओ (Lioness video) ट्रेंडिगवरती ( Trending video) आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की सिंहिणींचा रुबाब काय असतो ते...

शान असावी तर अशी... 

हा विस्मयकारक व्हिडीओ पाहून तुमचा दिवस बनेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भररस्त्यात तीन सिंहिणींचा स्टायलिश वॉक (Stylish Walk) पाहिला मिळाला. जंगलाच्या तीन राण्या जेव्हा रस्त्यावर निघतात तेव्हा त्यांची शान काय असते ते हा व्हिडीओ पाहून दिसतं. या सिंहिणींच्या मागे गाड्यांचा ताफा पाहिला मिळतो. (trending videoThree lionesses walking in the road nmp)

हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) क्रुगर नॅशनल पार्कमधील (Kruger National Park ) आहे. हा व्हिडीओ वन्यजीव छायाचित्रकार डीऑन केलब्रिकने (Wildlife photographer Deon Kelbrick ) इंस्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्क हे जगभरातील सर्वात लोकप्रिय वन्यजीव सफारी स्थळांपैकी एक आहे. या विदेशी दक्षिण आफ्रिकन राष्ट्रीय उद्यानात सिंह आणि एक शिंगे असलेल्या गेंड्यांपासून ते जंगली हत्ती आणि म्हशींपर्यंत काही भव्य प्राणी आहेत. 

हा व्हिडिओ चार आठवड्यांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. नेटिझन्सकडून ही सुंदर क्लिप पुन्हा-पुन्हा शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होतो आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 1.3 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 81.7k पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.