VIDEO : विमानाचं दार आकाशात उघडलं अन् मग...

Viral Video : नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर विमानाच्या सुरक्षेची अनेक प्रश्न समोर आले आहेत. नुकतीच एक घटना समोर आली आहे, ज्यात विमानाचं आपत्कालीन दरवाजा उघडला गेला. त्यानंतर जे झालं ते...

Updated: Jan 19, 2023, 04:13 PM IST
VIDEO : विमानाचं दार आकाशात उघडलं अन् मग... title=
Trending Video What happens when an airplane or plane door opens in the sky air indigo emergency exit viral on social media

Indigo Flight Trending Video : नेपाळ विमान दुर्घटनेमध्ये (nepal plane crash) 72 जणांचा नाहक बळी गेला. त्यानंतर विमान सुरक्षेसंबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले. या घटनेनंतर अजून एका घटनेने अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. भाजप खासदार तेजस्वी सूर्या (BJP MP Tejashwi Surya) यांच्याकडून निष्काळजीपणा झाला. चेन्नईहून तिरुचिरापल्ली विमानतळावर इंडिगोच्या फ्लाइटमध्ये (Indigo Flight) चढत असताना तेजस्वी सूर्या यांच्याकडून विमानाचे आपात्कालीन दरवाजा उघडल्या गेला. त्यानंतर एकच अफराफरी झाली. या घटनेनंतर विमानातील सर्व आवश्यक अभियांत्रिकी तपासणी करण्यात आली. या घटनेबद्दल सूर्या यांनी माफी मागितली आहे. सध्या सोशल मीडियावर (Viral Video) एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) व्हायरल होतो आहे. ज्यात उंच आकाशात विमानाचं दरवाजा हवेतच उडल्यामुळे काय घडतं हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. 

जेव्हा आकाशात विमानाचा दरवाजा उघडतो...

IrAero च्या An-26 विमानाने सायबेरियन शहर मॅगन ते मगदानपर्यंत उड्डाण केलं. विमान आकाशात उडतं असताना अचानक त्याचा मागचा दरवाजा उघडला गेला. यानंतर प्रवाशांचे सामान विमानातून खाली पडू लागले. हे भयावह दृश्यं अंगावर काटा आणणारं आहे. विमानातील सर्व प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. विमानात सहा क्रू मेंबर्ससह 25 जण होते. एका व्यक्तीने या थरकाप उडवणारे दृश्यं त्याचा कॅमेऱ्यात कैद केले.  (Trending Video What happens when an airplane or plane door opens in the sky air indigo emergency exit viral on social media)

थोडक्यात जीव वाचला

हा व्हिडीओ पाहून निशब्द व्हायला होतं. या विमानातील प्रवाशांचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होतं आहे. तर आम्ही तुम्हाला सांगता यात कोणालाही दुखापत झाली नाही. वैमानिकाने मगनच्या दिशेने विमान वळवलं आणि यशस्वीरित्या उतवलं. देव बलवत्त होता म्हणून एवढा मोठा अपघात टळला. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हवेत दरवाजा उघडतो तेव्हा काय होतं?

जेव्हा विमान उड्डाणासाठी सज्ज असतं तेव्हा त्याचे दरवाजे हायड्रॉलिक दाबाने बंद केले जातात. पण विमानाच्या केबिनमधील दाब हा समुद्राच्या पृष्ठभागावरील हवेच्या तुलनेत खूप कमी असतो. त्यामुळे जेव्हा विमान अती उंचीवरून हवेत उडतं असते तेव्हा प्रेशर लॉक आपलं काम सुरु करतं. पण कधी कधी हवेत हा दरवाजा उघडतो.