सापासोबत म्युझिक Video शूट करणे अभिनेत्रीला पडलं महागात

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल काहीतरी हटके करावं म्हणून भन्नाट आयडिया शोधतं असतात. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपला जीव धोक्यात घातला. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. 

Updated: Oct 31, 2022, 03:26 PM IST

trending_video_snake_bite

Snake Viral Video : सापाचं (Snake) नाव घेतलं की मनात पहिले येते ती म्हणजे भीती...अजगर (python), साप यांचे थरारक आणि भयानक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल काहीतरी हटके करावं म्हणून भन्नाट आयडिया शोधतं असतात. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपला जीव धोक्यात घातला. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. गेल्या काही वर्षांमध्ये प्राण्यांसोबत शूटिंग करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर आला होता. त्या करीता योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरो के खिलाडी' (Khatro K Khiladi) या टीव्ही शोमध्ये कलाकारांना भयानक प्राण्यांसोबतचा स्टंट (Stunt with animals) करताना पाहिला आहे. 

अरे देवा हे काय!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ब्लॅक लेस बॉडीसूट घातलेली एक अभिनेत्री पांढऱ्या बॅकड्रॉपवर झोपल्याची दिसतं आहे. त्याचा अंगावर एक काळा साप रेंगतोय आणि तिचा एक सहकारी तिच्या अंगावर अजून एक पांढरा साप टाकतो.  (trending video snake bite actress singer maeta gets video viral nmp)

धक्कादायक व्हिडीओ (Shocking video)

जेव्हा पांढरा साप तिच्या अंगावर टाकण्यात आला तेव्हा काळा सापाने अभिनेत्रीवर (actress) हल्ला केला. अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा सापाने चावा घेतला. या घटनेनंतर अभिनेत्री झटक्याने सापाला दूर करते आणि उठून उभी राहते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Maeta (@maetasworld)

'आयुष्यातील भयंकर अनुभव'

ही घटना अमेरिकेतील (America) 21 वर्षांची गायिका माएटा (actress singer maeta) हिच्यासोबत घडली आहे. हा माझ्या आयुष्यातील एक भयंकर अनुभव होता आणि या घटनेनंतर आपल्या मनात प्रचंड भीती निर्माण झाल्याचं माएटा म्हणाली. नशिबाने हा साप बिनविषारी असल्यामुळे माएटाच्या जिवाला कुठलाही धोका निर्माण झाला नाही. पण माएटाच्या मनात कायमची भीती निर्माण झाली आहे आणि तिला जबर मानसिक धक्का बसला आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.