लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...

Updated: Sep 1, 2023, 10:52 AM IST
लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ  title=
Trending News woman giving birth in elevator and threw newborn baby in dustbin in china video viral on Internet

Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने इमारतीच्या लिफ्टमध्ये बाळा जन्म दिला. त्यानंतर तिने नवजात बाळा डस्टबिनमध्ये फिकून दिलं. ही सर्व घटना इमारतीच्या आणि लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Trending News woman giving birth in elevator and threw newborn baby in dustbin in china video viral on Internet)

या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, एक महिला सूटकेससोबत लिफ्टमध्ये प्रवेश करते. त्यानंतर ती लिफ्टचं बटन दाबते. काही वेळानंतर ती लिफ्ट मध्येत थांबते आणि ती बाळाला जन्म देत. त्यानंतर लिफ्टमध्ये तान्हु्ल्याचा जन्मामुळे रक्ताचे जे काही डाग पडले होते. तिने ते सर्व डाग टिश्यूच्या साह्याने  साफ केले. त्यानंतर तिने स्वतःलाही टिश्यूने स्वच्छ केलं. 

त्यानंतर तिने परत लिफ्टचं बटन दाबलं आणि लिफ्ट काही वेळानंतर थांबली. लिफ्टच्या बाहेर पडता क्षणीच तिथे असलेल्या डस्टबिनमध्ये तिने त्या बाळाला फेकून दिलं. कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने त्या बाळावर खूप सारे टिश्यू पेपर पसरवले. त्यानंतर ती बुटावरील रक्ताचे डानही साफ करते. ते हे सगळं करत असताना तिथे एक म्हातारी आजी येते. तिला शंका येते आणि ती डस्टबिनमध्ये वागून बघते. 

मात्र ती महिला अतिशय चपळाईने त्या महिलेला तिथून हकलून लावते. त्यानंतर ती महिला दुसऱ्या बाजूची लिफ्ट बोलवते आणि त्यातून सुटकेस घेऊन निघून जाते. 

ही घटना 21 ऑगस्टला रात्री 8.44 वाजताची आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना चीनमधील आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी महिला ही दक्षिण पश्चिम चीनमधील चोंगकिंगमध्ये सुट्टीवर आली होती. त्यावेळी एका निवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये तिने हे भयानक कृत्य केलं. 

काही वेळानंतर इमारतीच्या लोकांना डस्टबिनमध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांना ते बाळ मिळालं. त्यांनी त्याला डस्टबिनमधून काढून तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मिळालेल्या माहितीनुसार बाळाची प्रकृती स्थिती आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून महिलेने असं कृत्य का केलं याचा शोध घेत आहे.