त्याने परफेक्ट प्लॅन करुन बायकोला संपवलं, परंतु रोजच्या 'या' सवयीमुळे तो पकडला गेलाच

पोलिसांनी त्याला ज्या प्रकारे शोधून काढलं हे एकाद्या सस्पेन्स सिनेमापेक्षा कमी नाही.

Updated: Feb 21, 2022, 07:02 PM IST
त्याने परफेक्ट प्लॅन करुन बायकोला संपवलं, परंतु रोजच्या 'या' सवयीमुळे तो पकडला गेलाच  title=

ग्रीस : आपण हे सिनेमा, पुस्तक किंवा अनेक ठिकाणी हे वाचलं असेलच की, आरोपी कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा नक्कीच मागे ठेवतो. फक्त गरज असते ती योग्य वेळी योग्य व्यक्तीने तो ओळखण्याची. बऱ्याचदा होतं असं की, एखादा आरोपी आपण केलेल्या चुकीला लपवण्यासाठी जातो खरा परंतु तेव्हाच तो अशी काहीतरी चूक करुन बसतो की, त्यामुळे त्याचं भांड उघडं पडतं.

असाच काहीसा प्रकार ग्रीसमधील एका नवऱ्यासोबत घडला. याने आपल्या बायकोला संपवण्यासाठी असा प्लॅन आखला की, तो कधीही यात फसणार नाही. परंतु त्याच्या एका गोष्टीमुळे पोलिसांनी त्याला पुराव्यासकट पकडलं.

पोलिसांनी त्याला ज्या प्रकारे शोधून काढलं हे एकाद्या सस्पेन्स सिनेमापेक्षा कमी नाही. जे जाणून घेतल्यावर तुम्ही विचार करु लागाल की असं मला का नाही सुचलं.

हा हॅलिकॉप्टर पायलट 33 वर्षाचा आहे आणि त्याचे नाव  बाबीस अनाग्मोस्टोपॉलोस आहे. त्याच्या 20 वर्षीय पत्नीचे नाव कॅरोलिन क्रॉउच आहे. हे दोघे पती पत्नी आणि त्यांचे लहान बाळ एका बेटावर फिरायला गेले होते. तेव्हा या पायलटने आपल्या बायकोची हत्या केली.

त्याने स्वत: आपल्या बायकोची हत्या करुन देखील पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांना सांगितले की, ते ज्या बेटावर गेले होते, तेथे काही चोरट्यांची टोळी आली होती. ज्यांनी त्याला एका खांब्याला बांधून ठेवले आणि त्याच्या बायकोची त्याच्या समोरच हत्या केली.

त्याने पोलिसांना हे देखील सांगितले की, त्यांच्या घरातील सीसीटीव्हीला ही या चोरट्यांनी 4-5 तासांपूर्वी बंद केले होता. ज्यामुळे त्यामध्ये कोणतेही दृश्य कैद झाले नाहीय

बाबीस अनाग्मोस्टोपॉलोस हा एक परफेक्ट मर्डर प्लॅन केला होता. त्याला हे माहित होते की, बेटावरती फारशी जास्त लोकं नाही, त्यात सीसीटीव्ही बंद झाला तर प्रश्नच मिटला. त्याला आता कोणीही पकडू शकणार नाही. तसेच, जरी पोलिसांना त्याच्यावरती संशय आला तरी त्याच्याकडे काहीही पुरावा नसल्यामुळे त्याला कोणीही पकडू शकणार नाही. त्यामुळे तो बिधास्त झाला.

परंतु तो एक गोष्ट विसरलो होता. ती म्हणजे त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या हाताती स्मार्ट वॉच. ज्यामुळे पोलिसांना ठोस पुरावे सापडले आणि त्यांनी बाबीसला अटक केलेच.

खरेतर बाबीसने पोलिसांना त्याच्या पत्नीच्या मृत्यूची जी वेळ सांगितली होती. त्यावेळी त्याची पत्नी जिवंत होती आणि तिच्या हृदयाचे ठोके सुरू होते. हे पोलिसांना त्याच्या पत्नीच्या हातातील घड्याळावरुन लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना बाबीसवर संशय आला आणि त्यांनी आणखी पुरावे जमवायला सुरुवात केली.

त्यावेळी पोलिसांच्या असे लक्षात आले की, ज्या वेळत बाबीस त्याला खांब्याला चोरट्यांनी बाधून ठेवले आहे असे सांगित आहे. त्यावळेत त्याला खांब्याला बांधलेले नव्हते किंवा तो एका जागेवर थांबला देखील नव्हता. त्याच्या घडाळ्यातील स्टेप ट्रॅकर, त्यावेळेत त्याचे स्टेप ट्रॅक करत होता. म्हणजेच बाबीस त्यावेळेला चालत होता किंवा धावपळ करत होता. हे पोलिसांना कन्फर्म झाले.

पोलिसांनी या सगळ्याचा पुरावा देत बाबीसला बोलतं केलं आणि बाबीसने देखील आपला गुन्हा मान्य केला.

बाबीसने सांगितले की, त्या दोघात हॉटेल बदण्यावरुन भांडण झाले होते. तेव्हा त्या दोघांमध्ये झटापट झाली आणि रागाच्या भरात त्याने नकळत त्याच्या पत्नीचा गळा दाबला. बाबीसने पोलिसांना त्याच्या बायकोच्या हत्येचं कारण एक ऍक्सिडंट होतं असं भासवलं असलं तरी, यामागील खरं कारण काही वेगळंच आहे. कारण त्याने सीसीटीव्ही कॅमेरा हा ठरवून बंद केला होता. परंतु हे या व्यक्तीने पोलिसांसमोर मान्य केलेलं नाही.