श्रीमंती हवी तर अशी! ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी मुलीने केलं असं काही... कोणी विचारही केला नसेल

Trending News : देशात सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वाहतूककोंडीची. वाहतूक कोंडीमुळे अनेक तास वाया जातात. अशा वेळी आपण हतबल असतो. पण वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी एका मुलीने असा उपाय काढला ज्याचा कोणी विचार केला नसेल.

राजीव कासले | Updated: Jun 20, 2024, 10:00 PM IST
श्रीमंती हवी तर अशी! ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी मुलीने केलं असं काही... कोणी विचारही केला नसेल title=

Trending News : वाहतूक कोंडीची समस्या केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. वाहतूक कोंडीमुळे (Traffic) लोकांचे अनेक तास वाया जातात. यावर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण यानंतरही ही समस्या कमी झालेली नाही. वाहतूक कोंडीत सापडल्यावर हतबल होण्याशिवाय सर्वसामान्यांकडे पर्याय नसतो. पण वाहतूककोंडीवाचून वाचण्यासाठी एका मुलीने असा तोडगा काढला ज्याचा कोणी विचारही केला नसेल. वाहतूक कोंडीसाठी अमेरिकेतलं न्यूयॉर्क शहर प्रसिद्ध आहे. इथं राहाणाऱ्या भारतीय निवासी असलेल्या खुशी सुरी या मुलीने न्यूयॉर्कच्या भयानक ट्रॅफिकपासून (New York Traffic) वाचण्यासाठी अनोखा मार्ग शोधला.

अशी श्रीमंती हवी
न्यूयॉर्कमध्ये राहाणाऱ्या खुशी सुरीला मॅनहटनपासून केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचायचं होतं. यासाठी खुशीलाने चक्क हेलिकॉप्टर बूक (Helicopter Ride) केलं. आता तुम्ही विचार कराल की हे श्रीमंतांचे चोचले आहेत. पण खुशीने ट्विटरवर आपला अनुभव शेअर केला आहे. खुशीची पोस्ट वाचून सर्वजण तिच्या बुद्धीचं कौतुक करतायत. खुशीने सोशल मीडिया एक्सवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात तीने उबेर कॅब आणि हेलिकॉप्टर राईडसाठी लागणाऱ्या खर्चाचा आणि लागणाऱ्या वेळेचा हिशोब मांडला आहे.

खुशीने शेअर केलेल्या पोस्टनुसार उबेर कॅब प्रवासाचं भाडं अंदाजे 131.99 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 11,023.47 इतकं होतं. याशिवाय मॅनहटनपासून केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी तिला एक तास वेळ लागणार होता. याच प्रवासासाठी ब्लेड हेलिकॉप्टरचं भाडं 165 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 13,780.39 इतकं होतं.  म्हणजे फरक केवळ दोन हजार रुपयांचा होता. विशेष म्हणजे  मॅनहटनपासून केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी केवळ पाच मिनिटं लागणार होती.

पैशांचा आणि वेळेचा हिशोब केला तर खुशीचा निर्णय अगदी योग्य होता असं युजर्स म्हणतायत. कारण उबेर कॅबमध्ये तीचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया जाणार होते. शिवाय वाहतूक कोंडीत अडकल्यास किती वेळेत पोहोचेल याचीही शाश्वती नव्हती. त्यामुळे तीने निवडलेला पर्याय चांगला होता, अशा प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर येतायत. विशेष म्हणजे इतक्या कमी खर्चात हेलिकॉप्टरची सेवा मिळते हेच अनेकांना माहित नव्हतं. खुशीच्या पोस्ट निमित्ताने लोकांना वाहतूक कोंडीतून वाचवण्याचा नवा मार्ग सापडला आहे.