लईजियाना : अमेरिकेतील लिजियाना येते एका जोडप्याविरूद्ध पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. या जोडप्यावर आरोप आहे की, त्यांनी ऊबर कंपनीच्या टॅक्सी चालकाला लुटले. मात्र, पोलिसांनी या जोडप्यातील महिलेवर आणखी एक आरोप ठेवला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
पोलिसांनी या महिलेवर आरोप ठेवला आहे की, तिने अर्धनग्न (टॉपलेस) होऊन चालकाला लुटले. पोलिसांचे म्हणने असे की, अर्धनग्न झालेल्या या महिलेने गाडी चालवत असलेल्या चालकाचे लक्ष विचलीत केले. हाराहन पोलिस प्रमुख टिम वॉकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती अशी की, या प्रकरणात एंथनी केनडी (वय २४), आणि रायना फिलियॉस (वय-२२) यांना अटक करण्यात आली आहे.
पीडित चालकाने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, फिलियॉसने जेव्हा कॅब (टॅक्सी) बुक केली तेव्हा त्याचा नंबर मिळाला. फिलियॉसने चालकाला फोन करून बोलूवून घेतले. चालकाने सांगितले की, फिलियॉसने जेव्हा गाडीत बसण्यासाठी पुढचा दरवाजा उघडला तेव्हा ती, अर्धनग्न होती. चालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले की, फिलियॉसने गाडीत बसतात चालकाला आपल्या बाहूत गेतले. तसेच, त्याला आपल्या मिठीत घेऊन त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करण्यास सुरूवात केली. जेणेकरून त्याचे लक्ष विचलीत व्हावे. हा प्रकार सुरू असताना तिचे चालकाची जीभही चावल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
जेव्हा फिलियॉसने चालकाला आपल्या मिठीतून दूर केले तेव्हा, तिचा दुसऱा जोड़ीदार केनडी याने चाकूचा धाक दाखवत चालकाकडे पैशाची मागणी केली. जेव्हाचालकाने चाकूच्या धाकाला न घाबरता पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा केनडीने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. या जोडप्यावर यापूर्वीही अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.