घोर कलियुग!! आधी चोरी केली आणि नंतर स्वतःच पोलिसांना बोलवलं; वाचा नेमकं काय घडलं...

अट्टल चोराने चोरीनंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिलीय

Updated: Oct 21, 2022, 04:44 PM IST
घोर कलियुग!! आधी चोरी केली आणि नंतर स्वतःच पोलिसांना बोलवलं; वाचा नेमकं काय घडलं... title=

सामान्यतः चोर (thief) एखाद्या ठिकाणी चोरी करतो आणि कोणाला काही कळायच्या आतच पळून जातो. यानंतर चोरी झालेल्या ठिकाणीवरील व्यक्ती पोलिसांना याची सूचना देते आणि मग तपास सुरु होतो. प्रत्येक चोरीच्या (thief) घटनेत सामान्यतः असाच घटनाक्रम असतो. मात्र एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या घटनेत चोरानेच पोलिसांना (Police) या घटनेची माहिती दिली आहे. स्वतःला वाचवण्यासाठी या चोराने पोलिसांनाच बोलावून घेतलं आहे. (Thief calls police to avoid mob lynching in Bangladesh)

बांगलादेशात (bangladesh) ही घटना घडली आहे. बांगलादेशातील बारिसाल शहरात बुधवारी चोरट्याने (thief) एका किराणा दुकानाला लक्ष्य केले. स्थानिक पोलीस प्रमुख असद उझ जमान यांनी ही माहिती दिली आहे. माझ्या दशकभराच्या कारकिर्दीत चोराने गुन्हा (Crime) केल्यानंतर पोलिसांना बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे जमान यांनी सांगित 40 वर्षीय यासीन खान सामान चोरण्याच्या उद्देशाने बंद दुकानात घुसला होता. जेव्हा तो चोरी करुन निघणार होता, तेव्हा त्याला समजले की सकाळ झाल्याने लोक बाजारात येऊ लागले आहेत.

बाहेर जमलेला संतप्त जमाव पाहून खानला भीती वाटली आणि त्याने पोलिसांना याची माहिती दिली. त्याने पोलिसांना वाचवण्यास सांगितले. जमान यांनी सांगितले की, 'आम्ही दुकानात गेलो आणि जमावाने त्याला हात लावण्यापूर्वीच आम्ही त्याला बाहेर काढले आणि ताब्यात घेतले.मी माझ्या करिअरमध्ये अशी घटना पाहिली नाही.'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोराला वाटले की, तो स्वत: दुकानाबाहेर गेल्यास जमाव आपल्याला बेदम मारहाण करेल. त्यामुळे चोराने राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 999 वरून पोलिसांना फोन करून आपली परिस्थिती समजावून सांगितली आणि त्याला सुखरूप बाहेर पडण्यास मदत केली. धोका लक्षात येताच स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

दुकानाचे मालक झोंटू मियाँ यांनी सांगितले की खानने आवश्यक वस्तूंनी एक मोठी बॅग भरली होती, पण तो दुकानातून पळू शकला नाही. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा अट्टल चोर असून त्याला आधीही चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.