व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलं

एका व्यक्तीने असे धाडस केले आहे जे पाहून यमराजही अचंबित होतील. एक तरुण व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला आहे.   

वनिता कांबळे | Updated: Aug 28, 2024, 08:44 PM IST
व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलं

Trending News : काळ आला होता पण वेळ आली नव्हती... अशी म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच एका व्यक्तीसह घडले आहे. अमेरिकेतील एक तरुण व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला आहे. या तरुणाने मृत्यूला चकवा दिला आहे.  व्हेल माशाच्या पोटात काय काय दिसलं याचा थरारक अनुभव देखील या तरुणाने सांगितले आहे. 

मायकेल पॅकार्ड असे या तरुणाचे नाव आहे. मायकेल पॅकार्ड हा अमेरिकेतील रहिवाशी असून तो एक स्कूबा डायवर आहे. संयम आणि मन शांत ठेवले तर, मोठ्या संकटातून आपण सुखरुप बाहेर पडू शकतो हे मायकेल पॅकार्ड याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. समुद्रात स्कुबा डाविंग करत असताना मायकेल पॅकार्ड याला एका अवाढव्य व्हेल माशाने गिळले. त्याचा मृत्यू जवळपास अटळ होता. मात्र, तरीही देखील त्रस्त न होता डोक शांत ठेवून तो मृत्यूच्या दाढेतून बाहरे आला आहे. 

व्हेल माशाच्या पोटात काय दिसले?

मायकेल पॅकार्ड याला व्हिल माशाने गिळले तेव्हा माशाच्या पोटात काय काय दिसले याचा अनुभव देखील त्याने सांगितले आहे. स्कूबा डायव्हिंग करत असताना अचानक एका भुयारात गेल्यासारखे वाटले. काही क्षणातच माझा लक्षात आले की मी व्हेल माशाच्या जबड्यात अडकलो आहे. व्हेल माशाने गिळल्यानंतर मी त्याच्या पोटात गेलो. व्हेल माशाच्या पोटात सगळीकडे मला काळ काळ दिसत होत. आतमध्ये प्रचंड वेगाने हालचाली जाणवत होत्या.  माझ्यावर पूर्णपणे दबाव आल्यासारखे वाटत होते असं  मायकेल पॅकार्ड  म्हणाला.

व्हेल माशाच्या पोटातून बाहेर कसा पडला?

मृत्यूच्या दाढेत अडकलेला मायकेल पॅकार्ड यातून सुखरुप पडला. व्हेल मशाने गिळल्यानंतर भयभित न होता अगदी धीराने आणि शांत डोक्याने त्याने यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. मी व्हेल माशाच्या जबड्याच्या बाजूला जोर जोरात लाथा मारल्या. यामुळे व्हेल माशाने तोंड उघडले. याक्षणीच मी व्हेल माशाच्या जबड्यातून बाहेर आलो असे मायकेल पॅकार्ड यांनी सांगितले. मायकेल पॅकार्ड याच्या संयमाचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x