किरेबास... प्रशांत महासागरात हळूहळू नाहिसा होणारा देश!

एक दिवस हा देश सोडून द्यावा लागेल, हे किरेबासच्या जनतेला माहिती आहे पण...

Updated: Nov 1, 2019, 03:42 PM IST
किरेबास... प्रशांत महासागरात हळूहळू नाहिसा होणारा देश! title=

नवी दिल्ली : दक्षिण प्रशांत महासागरात किरेबास (KIRIBATI) नावाचा एक देश आहे जो आतापासूनच बुडायला सुरुवात झालीय. या देशातल्या जमिनीचा मोठा भूगात समुद्रानं गिळलाय. येत्या काही महिन्यांमध्ये हा देश समुद्र गिळून टाकेल अशी स्थिती आहे. अख्खा देशच स्थलांतरीत करण्याची वेळ किरेबासवर आलीय.

प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलिया आणि हवाई बेटांच्या दरम्यान किरेबास नावाचा देश आहे. समुद्रसपाटीपासून खाली असणारा हा देशा आता बुडू लागलाय. गेल्या दहा वर्षात या बेटावरचा प्रत्येक माणूस समुद्राच्या उधाणापासून घर वाचवण्याचा प्रयत्न करतोय. 

Image result for kiribati
सौ. सोशल मीडिया

 

बेटाचा किनारी भाग समुद्रानं कधीच गिळंकृत केलाय. समुद्र आता लोकांच्या अंगणात येऊन पोहचालाय. समुद्राच्या जमिनीवरील अतिक्रमणामुळे जवळपास दहा हजार लोकांनी राजधानीचं शहर तारावात स्थलांतर केलंय. स्थानिकांची घरं पाण्याखाली जातायत. ही घरं वाचवण्याची केविलवाणी धडपड ते करताना दिसतात.

एक दिवस हा देश सोडून द्यावा लागेल, हे किरेबासच्या जनतेला माहिती आहे. पण आपण हा देश बुडण्यापासून वाचवू या वेड्य़ा आशेवर इथली जनता आहे. इथली तरुणाई किनाऱ्यावर खारफुटीची लागवड करतेय. खारफुटीमुळं हे बेट बुडणार नाही अशी आशा त्यांना आहे. किरेबास प्रशासनानं फिजी बेटांवर जमीन खरेदी केलेली आहे. ही बेटं पाण्याखाली गेल्य़ावर तिथल्या जनतेला फिजीत आश्रय घेता येणार आहे.