'इंटरनेटने संस्कृती जवळ आणली पण.... ', झुकरबर्गची भावनिक साद

2020 चा मार्कचा अजेंडा ब्लॉगमधून शेअर 

Updated: Jan 12, 2020, 12:22 PM IST
'इंटरनेटने संस्कृती जवळ आणली पण.... ', झुकरबर्गची भावनिक साद  title=

मुंबई : फेसबुकचा फाऊंडर आणि सीईओ मार्क झुकरबर्ग दरवर्षी ब्लॉग लिहून शेअर करत असतो. या ब्लॉगमध्ये मार्कने अतिशय खास अशा गोष्टी शेअर केल्या आहेत. यामध्ये मार्कने म्हटलंय की,'इंटरनेटद्वारे आपल्या कक्षा रुंदावल्यात तसेच संस्कृती आणि संधी दूरपर्यंत पोहोचली आहे. मात्र अशा मोठ्या समुदायात राहण्यात एक मोठे आव्हान आहे.'

मी एका लहानशा गावात लहानाचा मोठा झालो. त्यावेळी मी स्वतःला वेळ देत होतो. मात्र आता असंख्य लोकांच्या समुहात राहूनही मी माझी स्वतःची वेगळी अशी ओळख शोधत आहे. मला माझ्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला वेळ द्यायचाय, अशी खंत मार्कने व्यक्त केली आहे. 

आपल्या प्रत्येकालाच स्वतःला वेळ द्यायला हावा. या दरम्यान आपण कोण आहोत आपली ओळख काय? यासारख्या गोष्टींचा विचार करायला नको. मला या सगळ्याची खूप गरज आहे. कारण माझ्या आयुष्य खूप सार्वजनिक झालं आहे. मला माझ्या माणसांना वेळ द्यायचाय तो मार्क झुकरबर्ग म्हणून नाही तर एक माणूस म्हणून. मला आशा आहे की, ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचेल. 

यावर्षी अनेक गोष्टी आपल्याला समाजाशी, आपल्या माणसांशी जोडण्याच्या प्रयत्नात असतील. या गोष्टीच्या विचारात असून मी खूप उत्साहात आहे. पुढील 5 वर्षांत आपला डिजिटल सामाजिक वावर हा खूप वेगळा असेल. पुन्हा एकदा खासगी गोष्टींकडे लक्षकेंद्रीत केलं जाईल. 

यावर्षी वेगवेगळ्या आव्हानांपेक्षा वेळेवर लक्ष केंद्रीत करेन. यागोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 2030 पर्यंत माझं आयुष्य कसं असेल? माझी मुलगी मॅक्स, त्यावेळी शाळेत जायला लागली असेल. 

या सगळ्या भावना मार्कने त्याच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या आहेत. मार्कने आपल्या फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे. फेसबुकचा निर्माता म्हणून मार्कची ओळख आहे. 4 फेब्रुवारी 2004 मध्ये मार्कने फेसबुकची निर्मिती केली. मे 2012 मध्ये फेसबुक अधिकृत झालं. आज इंटरनेट आणि फेसबुक हे प्रत्येक माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत.