PhotoShop चे जनक, Adobe चे सहसंस्थापक जॉन वरनॉक यांचे निधन

एखाद्या क्रिएटिव्ह फोटो बनवायचे असेल तर Adobe PhotoShop हे सॉफ्टवेअर वापरतो. PhotoShop चे जनक, Adobe चे सहसंस्थापक जॉन वरनॉक यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे.  

Updated: Aug 21, 2023, 04:51 PM IST
PhotoShop चे जनक, Adobe चे सहसंस्थापक जॉन वरनॉक यांचे निधन title=

Adobe Co-Founder Dr. John Warnock Pass away : Photoshop, Adobe Premiere Pro, Adobe Acrobat हे सॉफ्टवेअर जगप्रसिद्ध आहेत. या सॉफ्टवेअरच्या निर्मीतीमध्ये महत्वाचे योगदान असलेले आणि  Adobe चे सहसंस्थापक जॉन वरनॉक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Adobe कंपनीने त्यांच्या मृत्यूबाबतचे वृत इमेल द्वारे जाहीर केले आहे.

वयाच्या 82 व्या वर्षी मृत्यू 

जॉन वरनॉक यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले आहे. जॉन वरनॉक यांच्या मृत्यूबाबतचे नेमके कारण समोर आलेले नाहीा. मात्र, वृद्धपकाळामुळे त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  2000 मध्ये जॉन वरनॉक यांनी कंपनीच्या सीईओ पदावरुन निवृत्त घेतली. यांनतर त्यांनी कंपनीच्या बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले. 2017 पर्यंत त्यांनी  पार्टनर गेश्के यांच्यासह अध्यक्षपद शेअर केले होते. 2021 मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी गेश्के यांचे निधन झाले. 

अशी झाली   Adobe ची स्थापना

जॉन वरनॉक आणि गेश्के यांची ओळख  झेरॉक्स होल्डिंग्स कॉर्पोरेशन कंपनीत झाली. एकत्र काम करत असताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या नंतर त्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला.  पोस्टस्क्रिप्ट हे पहिले प्रॉडक्टक या दोघांनी एकत्र लाँच केले. त्यांच्या या प्रॉडक्टने डेस्कटॉप प्रकाशन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास मदत केली. यानंतर या दोघांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या प्रोडक्टची निर्मीती केली. Adobe ने अनेक सॉफ्टवेअर डेव्हलप केले.  ग्राफिक डिझाइन, फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग असे सॉफ्टवेअर तयार केले.  Adobeचे  हे सॉफ्टवेअर जगभरात प्रसिद्ध आहेत. या  फ्टवेअरमुळे इमेजीनेशनला प्रत्यक्षात व्हिज्युअलाईज करता आले.

वैज्ञानिक ते बड्या कंनीचे को फाऊंडर

वैज्ञानिक ते कंनीचे को फाऊंडर असा जॉन वरनॉक यांच्या करिअरचा प्रवास आहे. Adobe ची स्थापना करण्यापूर्वी, वॉर्नाक हे झेरॉक्स पालो अल्टो संशोधन केंद्रात प्रमुख शास्त्रज्ञ पदावर कार्यरत होते. इव्हान्स अँड सदरलँड कॉम्प्युटर, कॉम्प्युटर सायन्सेस कॉर्पोरेशन, आयबीएम आणि उटाह विद्यापीठ अशा नामांकित संस्थांमध्ये  जॉन वरनॉक यांनी महत्वाच्या पदावर काम केले आहे.  जॉन वरनॉक यांनी पदव्या मिळवल्या आहेत. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट, गणितात पदव्युत्तर पदवी आणि उटाह विद्यापीठातून गणित आणि तत्त्वज्ञान या विषयांत त्यांनी बॅचलर पदवी मिळवली आहे. जॉन वरनॉक यांच्या मृत्यू पश्चात पत्नी मारवा आणि तीन मुले असा कुटूंब परिवार आहे.