मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाल्या कात्री बसली आहे. वाढत्या किंमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर पोहोचली आहे. पण भारताच्या शेजारील देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर फार कमी आहेत. भारताच्या शेजारील देश पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि श्रीलंकेतील पेट्रोलचे दर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पाकिस्तानमध्ये तर चक्क अर्ध्या किंमतीत प्रवाशांना पेट्रोल खरेदी करता येत आहे.
भारतात पेट्रोलसाठी जवळपास 103 रुपये मोजावे लागत आहेत. तर पाकिस्तानमध्ये पेट्रोलसाठी 55.61 रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमधील पेट्रोलचे दर globalpetrolprices.com ने प्रसिद्ध केले आहेत. श्रीलंकेत पेट्रोलची किंमत 68.62 रुपये आहे. भूतानसारख्या गरीब देशातही पेट्रोलची किंमत 77 रुपये लिटर आहे.
नेपाळमध्ये पेट्रोल 81.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. यामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागात राहणारे लोक वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नेपाळच्या दिशेने जात आहेत. जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल स्वस्त आहे. आम्ही तुम्हाला पहिल्या 9 देशांबद्दल सांगणार आहोत जिथे पेट्रोल सर्वात स्वस्त आहे. हे दर 4 ऑक्टोबर पर्यंत आहेत. या देशांमध्ये पेट्रोलचे दर तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
देश पेट्रोल (रुपये/लीटर)
व्हेनेझुएला 1.49
ईरान 4.46
अंगोला 17.20
अल्जेरिया 25.04
कुवैत 25.97
नायजेरिया 29.93
कझाकिस्तान 34.20
इथिओपिया 34.70
मलेशिया 36.62