Trending News : इथे भारतामध्ये (Cyclone Biparjoy) बिपरजॉय चक्रिवादळानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आणि सतर्कतेचा इशार म्हणून तिथे प्रशासकीय यंत्रणा आणि हवामान विभागाकडून मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला. चक्रिवादळाच्या धर्तीवर समुद्रातील नौकाही किनाऱ्यावर आणण्यात आल्या. सोशल मीडियावर या वादळाचे परिणाम व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यामतून पाहायला मिळाले. त्यातलाच एक व्हिडीओ अनेकांनाच पेचात पाडून गेला. काहींना तर व्हिडीओ पाहताना डोळ्यांवर विश्वासच बसेना.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये समुद्रातून चक्क मासळीच्या लाटा उसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल मग चांगलंय की, मासळीसाठी जाळं टाकायला नको..... पण, ही बाब अतिशय गंभीर आहे, कारण लाटांमधून वाहत येणारी ही मासळी मृत असून, अशा हजारो माशांचा खच किनारपट्टीवर साठला आहे.
ही घटना भारतातील नसून, अमेरिकेच्या टेक्सासमध्ये हा माशांचा खच पाहायला मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेकांनीच येऊन कचरा टाकावा आणि त्याचा खच व्हावा अशीच काहीशी परिस्थिती सध्या टेक्सासमधील किनाऱ्यावर पाहायला मिळत आहे. प्राथमिक कारणानुसार पाण्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं ही परिस्थिती ओढावल्याचं म्हटलं जात आहे. (Texas thoudands of Fish found dead on shore video goes viral latets update )
दक्षिण पूर्व टेक्सासमधील मामला भागात असणाऱ्या क्विंटाना बीच काऊंटी पार्कच्या वतीनं ही मासळी हटवली जात नाही तोवर नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांवर जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. मृत मासळी अनेक प्रकारच्या आजारपणांचं कारण ठरू शकते ज्यामुळं नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.य
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार अनेक कारणांतून ही परिस्थिती उदभवली आहे. यातलं पहिलं कारण म्हणजे समुद्रातील पाण्याचं वाढतं तापमान. गरम पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यात मासे फार काळ जगत नाहीत. सखल भागांमध्ये अशी वेळ येऊ शकते कारण तिथं उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळं पाण्याचं तापमान वाढतं. ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. ज्यामुळं माशांचा हा खच पाहायला मिळाला.
#Agenda At Full Play: In the US state of Texas, several beaches were home to these dead fish.
High sea water temperatures, according to authorities, may cause deaths.
However the truth is not the temperature but the Chemtrails, Radio frequency 5G. pic.twitter.com/sZ6d5n8KuG
— Aprajita Choudhary (@aprajitanefes) June 12, 2023
आणखी एक कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या भागातील समुद्र अतिशय शांत होता. लाटा कमी उसळल्यामुळं पाण्यातील ऑक्सिजनचं संतुलन बिघडलं. शिवाय काही रसायनांचा आणि घातक किरणांचा समुद्राच्या पाण्याशी येणारा संबंधही या माशांच्या मृत्यूचं कारण असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.