Elon Musk च्या ट्रांसजेंडर मुलीनं उचललं मोठं पाऊल, कोर्टात 'या' गोष्टीसाठी आवाहन

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, अलीकडेच 18 वर्षांचा झालेला एलोन मस्कचा मुलगा झेवियर अलेक्झांडर मस्क याने त्याचे लिंग बदलले आहे.

Updated: Jun 22, 2022, 04:02 PM IST
Elon Musk च्या ट्रांसजेंडर मुलीनं उचललं मोठं पाऊल, कोर्टात 'या' गोष्टीसाठी आवाहन title=

मुंबई : Tesla CEO आणि SpaceX चे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांच्या संदर्भात एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती अशी की त्याच्या ट्रान्सजेंडर मुलीला त्याच्यासोबत काहीही नातं ठेवायचं नाही. ज्यामुळे तिने कोर्टात देखील आपलं नाव बदलण्यासाठी अपिल केलं आहे. एलोनच्या मुलीचं म्हणणं आहे की, ती यापुढे तिच्या जैविक वडिलांसोबत (Biological Father) कोणत्याही प्रकारे राहत नाही आणि त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवू इच्छित नाही.

नाव बदलण्यासाठी आणि तिची नवीन ओळख दर्शविणारे नवीन जन्म प्रमाणपत्रासाठी याचिका एप्रिलमध्ये लॉस एंजेलिस काउंटी सुपीरियर कोर्टात दाखल करण्यात आली होती.

PlainSite.org वर उपलब्ध असलेल्या न्यायालयीन कागदपत्रांनुसार, अलीकडेच 18 वर्षांचा झालेला एलोन मस्कचा मुलगा झेवियर अलेक्झांडर मस्क याने त्याचे लिंग बदलले आहे. जो आता स्त्री झाला आहे. त्‍याने आपली लिंग ओळख बदलून महिला असा अर्ज केला आहे आणि आपले नवीन नाव नोंदवले आहे.

ऑनलाइन कागदपत्रात त्याचे नवीन नाव बदलण्यात आले. त्याची आई जस्टिन विल्सन आहे, जिने 2008 मध्ये एलोन मस्कला घटस्फोट दिला.

नाव आणि लिंग बदल याचिका दाखल झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर मस्क यांनी मे महिन्यात रिपब्लिकन पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला. पक्षाचे निवडून आलेले प्रतिनिधी देशभरातील राज्यांमध्ये ट्रान्सजेंडर अधिकार मर्यादित करण्याच्या कायद्याचे समर्थन करतात.

मस्कने 2020 मध्ये ट्रान्सजेंडर लोकांच्या बाजूने एक ट्विटही केले होते. ज्यामध्ये त्याने स्पष्टपणे सांगितले की तो ट्रान्सला समर्थन करतो.

परंतु असे असले तरी त्याच्या ट्रांसजेंडर मुलीला आता आपल्या वडिलांसोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही.