ट्रम्प सोबत चर्चा निष्फळ, किम जोंगने 4 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या

उत्तर कोरियामधला एक धक्कादायक प्रकार 

Updated: May 31, 2019, 08:29 PM IST
ट्रम्प सोबत चर्चा निष्फळ, किम जोंगने 4 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या title=

नवी दिल्ली : उत्तर कोरियामधला एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. ट्रम्प यांच्यासोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष किम जोंग उनने आपला विशेष दूत किम हयोक चोल यांच्यासह 4 अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या आहेत. किम हयोक यांच्यावर अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध सुधारण्याची जबाबदारी होती. किम हयोक चोलला नॉर्थ कोरियाने अमेरिकासोबत संबंध सुधारण्यासाठी विशेष राजदूत बनवण्यात आलं होतं. बैठकीचं आयोजन करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर होती. 

मीडिया रिपोर्टनुसार, किम जोंग उनने अधिकाऱ्यांवर विश्वासघाताचा आरोप करत मृत्यूदंडाची शिक्षा दिली. यानंतर किम हयोक चोल यांच्यासह मिरिम एअरपोर्टवर परराष्ट्र मंत्रालयाच्या 4 अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. इतर चार जणांची नावे जाहीर करण्यात आलेली नाही. दक्षिण कोरियाईचे मंत्रालयाने रिपोर्टवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

समिटमध्ये एका चुकीमुळे किम जोंग उनने एका महिला इंटरप्रेटरला चक्क तुरुंगात टाकलं होतं. ट्रम्प यांनी 'नो डील'ची घोषणा केल्यानंतर किमचा नवा प्रस्ताव त्या ट्रान्सलेट करु शकल्या नव्हत्या. किम आणि ट्रम्प यांच्यात वियतनामच्या राजधानीमध्ये कोणतीही डील झाली नाही. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली.