Terrorist Attack : पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला, 4 जण ठार तर 10 जखमी

Terrorists Attack In Karachi : कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यात 4 जण ठार, 10 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तेहरिक ए इस्लाम पाकिस्तान गटाने स्वीकारली आहे.

Updated: Feb 18, 2023, 08:06 AM IST
Terrorist Attack : पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला, 4 जण ठार तर 10 जखमी title=
Karachi Terrorists Attack

Terrorists Attack In Pakistan : पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. (Karachi Terrorists Attack) आठ ते दहा दहशतवादी कराची पोलीस मुख्यालयात शिरले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. ( Terrorists Attack In Karachi ) सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले आहेत. तर दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत. तेहरिक ए इस्लाम पाकिस्तान या संघटनेनं (Tehreek-e-Islam Pakistan Organization) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ( Taliban Terrorists Attack )

पाकिस्तानी तालिबान अतिरेक्यांनी शुक्रवारी देशातील सर्वाधिक गर्दीचे असलेल्या शहरातील कराची पोलीस प्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला केला. ज्यामध्ये चार जण ठार झाले. देशभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना सुरक्षा दलांवर हल्ला करण्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे. कराची येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7.10 च्या सुमारास हा हल्ला झाला. कराची पोलिसांच्या प्रवक्त्याने एका निवेदनात पुष्टी केली की, कराची पोलीस प्रमुखांच्या मुख्य कार्यालयावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात चार पोलिसांसह सहा जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दहशतवादी पाकिस्तानी तालिबान या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी आधी कराची पोलीस प्रमुखांच्या कार्यालयाच्या इमारतीच्या मुख्य कंपाऊंडमध्ये अर्धा डझन हातबॉम्ब फेकले आणि नंतर आवारात प्रवेश केला. यावेळी निमलष्करी रेंजर्स, पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये जोरदार गोळीबार सुरु झाला.  हल्लेखोरांना घेरण्यासाठी जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्व मोबाईल व्हॅन तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आल्या होत्या. 

पाकिस्तानी तालिबानने सरकारसोबत महिनाभर चाललेली युद्धविराम संपुष्टात आणल्यानंतर नोव्हेंबरपासून पाकिस्तानमध्ये अतिरेकी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात, पाकिस्तानच्या अशांत वायव्य पेशावर शहरातील उच्च-सुरक्षा झोनमध्ये दुपारच्या नमाजच्यावेळी मशिदीमध्ये तालिबानी आत्मघाती बॉम्बरने स्वत:ला उडवले होते, ज्यात 100 हून अधिक लोक ठार झाले होते. यात अनेक पोलिसांचा समावेश होता.