Dance of Death: नाचता नाचता मृत्यूनं गाठलं; एकाच वेळी 400 लोकांचा गेला बळी

Dance Pleague: नाचता नाचता एखाद्याचा मृत्यू होणे ही घटना तेव्हा लोकांसाठी फारच धक्कादायक होती. तेव्हा कुठलीही वैद्यकीय सुविधा (Shocking Deaths of 400 People in France) नव्हती आणि त्याचबरोबर अशी घटना घडल्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 

Updated: Feb 17, 2023, 05:04 PM IST
Dance of Death: नाचता नाचता मृत्यूनं गाठलं; एकाच वेळी 400 लोकांचा गेला बळी  title=

Dance of Death in France : आयुष्य हे अगदी क्षणभंगूर असतं आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येकक्षण हा किती आनंदानं घालवायचा असतो याची प्रचिती आपल्याला असे काही व्हिडीओज (Death Videos) पाहून समजते. हल्ली सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज व्हायरल होतात जे पाहून आपल्यालाही अत्यंत धक्का (Shocking Videos) बसतो. त्यातून अशा घटना या काही आजच्या नाहीत तर त्या फार जुन्याही आहेत. त्यातील अशीच एक घटना आहे जी मानवी मनाला आजही हादरवून सोडणारी आहे, जी साधारण 500 वर्षांची जूनी आहे.

ही घटना 1518 मध्ये घडली होती. म्हणजे आजपासून सुमारे 505 वर्षांपुर्वी. तेव्हा तब्बल 400 लोकांचा बळी गेला होता (500 Year old Mystery in France) आणि तेव्हा या मृत्यूला कारण होते ते म्हणजे महामारीचं. तेव्हा जाणून घेऊया की नक्की हे कारण आहे तरी काय? ही घटना 1518 मधल्या स्ट्रासबर्ग (400 People lost their lives while dancing) येथील आहे. तेव्हा लोकांचा डान्स करत करता अचानक मृत्यू होऊ लागला. ही घटना इतकी गंभीर होती की या घटनेनंतर लोकांनी या प्रकाराला डान्स ऑफ डेथ असं नावं दिले. या घटनेचे रहस्य अद्यापही उलगडले नाही. 

नाचता नाचता एखाद्याचा मृत्यू होणे ही घटना तेव्हा लोकांसाठी फारच धक्कादायक होती. तेव्हा कुठलीही वैद्यकीय सुविधा नव्हती आणि त्याचबरोबर अशी घटना घडल्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या घटनेला लोकांनी चमत्कारापासून ते ब्लॅक मॅजिकपर्यंत लोकांनी संदर्भ द्यायला सुरूवात केली होती. परंतु ही घटना नक्की का घडली, त्याचसोबत त्यामागे कोणते शास्त्रीय कारण होते का? अशा प्रश्नांची उत्तरे ही 500 वर्षे होऊ गेली तरी कोणालाच मिळालेली नाहीत. त्यामुळे आजही ही घटना अनेकांसाठी रहस्यमयच आहे. परंतु या घटनेची नेमकी सुरूवात कशी झाली याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1518 फ्रान्स येथे म्हणजे तेव्हाचे स्ट्रासबर्ग (Stranceberg) येथे ही घटना पहिल्यांदा घडली होती. फ्राऊ ट्रॉफी (Frau Trophy) नावाची एक मुलगी त्यावेळी अचानकच नाचायला लागली. नाचता नाचता तिला भानच राहिले नाही आणि ती अचानक आपल्या घराच्या बाहेर अंगणात जाऊन नाचायला लागली. नाचतानाच ती गल्लीवर येऊन लागली तेव्हा आजूबाजूचे लोक गोळा होऊ लागले आणि तिच्याकडे आश्चर्यानं पाहू लागले. तेव्हा तिला थांबवण्यासाठी तिचं नातेवाईकही बाहेर आले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तिच्यासोबत तेही नाचू लागले आणि अचानक त्यांचा नाचता नाचता मृत्यू झाला. 

ही घटना गावागावात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामुळे सगळीकडेच घबराटही पसरली. म्हणता म्हणता तेथील अख्खं गावं नाचू लागले आणि ही साथ सगळीकडेच पसरली. त्यामुळे हा रोग म्हणता म्हणता सगळीकडेच पसरला. लोकं नाचू लागले आणि त्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यानंतर लोकांना या रोगाला डान्स प्लेग (Dance Pleague) असे नावं दिले. 

तेव्हा वैज्ञानिकांनी या घटनेला वेगवेगळ्या पद्धतीनं नावं दिली. कोणी याला मानसिक आरोग्याचा बळी म्हणून घोषित केले तर काहींनी त्याला चमत्कार नाहीतर काळी जादू म्हणून नाव दिले. त्यातून ही घटना आजही लोकांच्या स्मरणात आहे परंतु या घटनेमागील रहस्य (Mystery News) अजूनही कोणालाच कळले नाही.