मुंबई : अफगाणिस्तानात तालिबानने अफगाण वायु सेनेच्या Mi-24 अटॅक या हॅलिकॉप्टरला आपल्या ताब्यात घेतलं आहे. भारताने हा हेलिकॉप्टर अफगाणिस्तानला मैत्रीचं प्रतिक म्हणून भेट दिला होता. या हेलिकॉप्टरजवळ तालिबान लढाऊंची उपस्थिती असल्याचा एक व्हीडिओही व्हायरल झाला आहे. तालिबानने आपल्या ताब्यात घेतलेल्या या हेलिकॉप्टरची स्थिती वाईट आहे. अफगाण वायु सेनाने हेलिकॉप्टर सोडताना यामधून इंजिन आणि इतर उपकरणं काढून घेतली होती. त्यामुळे हा हेलिकॉप्टर झेपावू शकत नाही. (Taliban captures Mi 24 helicopter gifted from India flees from Afghan Air Force)
भारताकडून अफगाणिस्तानला 6 हेलिकॉप्टर...
भारताने अफगाणिस्तानला पहिल्यांदा 2015-16 मध्ये एकूण 4 Mi-24 हेलिकॉप्टर भेट दिले होते. यानंतर मे 2019 मध्ये भारताने पुन्हा 2 Mi-24 देण्यात आले. अफगाणिस्तानला हे हेलिकॉप्टर देण्यासाठी भारताकडून तत्कालीन भारतीय राजदूत विनय कुमार आणि अफगाणिस्तानचे रक्षा मंत्री असदुल्ला खालिदही उपस्थित होते. Mi-24 हेलिकॉप्टरची निर्मिती ही रशियात केली जाते. ज्याच्या एक्सपोर्ट व्हेरिएंटला Mi-35 म्हटलं जातं.
रशियात निर्मिती करण्यात आलेल्या Mi-24 हेलिकॉप्टरचा वापर भारतीय वायू सेना वापरायची. मात्र त्यानंतर भारताने आणखी अदद्यावर आणि मजबूत क्षमता असलेले हेलिकॉप्टरची खरेदी केली. त्यामुळे Mi-24 अफगाणिस्तानला देण्यात आले. विशेष म्हणजे भारताने तेव्हा पायलट आणि सपोर्ट स्टाफला प्रशिक्षणही दिलं होतं. अफगाणिस्तानला देण्यात आलेले हे हेलिकॉप्टर आधी अमेरिकेच्या वायू सेनेसोबत काम करायचे.
Mi-24 ची ताकद
Mi-24 हेलिकॉप्टर सेवियत संघाच्या काळात बनवण्यात आलं होतं. रशिया वायू सेनेत हा हेलिकॉप्टर पहिल्यांदा 1972 मध्ये वापरण्यात आला. त्यावेळेस या हेलिकॉप्टरचा वापर रशियासह इतर 58 देशात केला जातो. याचा उपयोग आधी भारतही करायचा.
हेलिकॉप्टरची आसनक्षमता किती?
रशियाच्या या हेलिकॉप्टरची आसनक्षमता ही 8 जणांची आहे. या हेलिकॉप्टरने अनेक देशांमध्ये युद्धाच्या वेळी भाग घेतला आहे. Mi-24 हेलिकॉप्टर 21.6 मीटर लांब आहे आणि पंखांची रुंदी आणि उंची 6.5 मीटर आहे. हे 2400 किलो पेलोडसह उडू शकते. यात 23 मिमी डबल बॅरल GSh-23V कॅनन आहे. जे एका मिनिटात 3,400 ते 3,600 राउंड फायर करू शकते.
Video reportingly shows #Taliban captured Kunduz airport with #Afghanistan Air Force Mi-35 Hind attack helicopter pic.twitter.com/u7jZJdR800
— Joseph Dempsey (@JosephHDempsey) August 11, 2021