तालिबान्यांचा क्रुर चेहरा आला समोर; विद्यार्थीनींसाठी काढला विचित्र फतवा

अफगानिस्तानच्या माहिला अधिकारांच्या सन्मानाचे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसातच तालिबानने आपला खरा चेहरा दाखवायला सुरूवात केली आहे. तालिबानी लोकांनी हेरात प्रांतातील सरकारी आणि खासगी विद्यापीठात मुले आणि मुलींच्या एकत्र शिक्षणाला बंदी घालण्यात आली आहे. 

Updated: Aug 21, 2021, 08:10 PM IST
तालिबान्यांचा क्रुर चेहरा आला समोर; विद्यार्थीनींसाठी काढला विचित्र फतवा title=

काबुल : अफगानिस्तानच्या माहिला अधिकारांच्या सन्मानाचे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसातच तालिबानने आपला खरा चेहरा दाखवायला सुरूवात केली आहे. तालिबानी लोकांनी हेरात प्रांतातील सरकारी आणि खासगी विद्यापीठात मुले आणि मुलींच्या एकत्र शिक्षणाला बंदी घालण्यात आली आहे. तालिबानने को एज्युकेशनला  समाजातील सर्व वाईट गोष्टींचे  मूळ मानले आहे.

खामा प्रेस वृत्त संस्थेच्या मते, तालिबानने विद्यापीठांच्या प्रोफेसर आणि खासगी शैक्षणिक संस्थांच्या मालकांची बैठक बोलवली होती.  साधारण 3 तास चाललेल्या या बैठकीत तालिबानी नेता मुल्ला फरीदने को एज्युकेशनला समाजातील सर्व वाईट घटनांचे मूळ असल्याचे सांगितले. त्यानंतर अफगानिस्तान मधील विद्यार्थ्यांसाठी पहिला फतवा (Taliban Latest Fatwa on Co-Ed Education)जारी करण्यात आला.

तालिबानने जारी केला हा फतवा
मुल्ला फरीदने म्हटले आहे की, मुले-मुलींनी एकत्र शिक्षण घेणे बंद व्हायला हवे. महिला शिक्षिकांना फक्त महिला विद्यार्थीनींना शिकवण्याची परवानगी असेल. ते कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिकवणार नाही. 

एका अंदाजानुसार अफगानिस्तानच्या हेरात प्रांतात खासगी आणि सरकारी विद्यापीठात सरकारी विद्यापीठात साधारण 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच 2 हजाराहून अधिक प्राध्यापक कार्यरत आहेत. तालिबानने नुकतेच हेरात प्रांतात जारी केलेले आदेश पूर्ण अफगानिस्तान मध्ये लागू होऊ शकतात.