बेरुत : सीरियात सुरु असलेल्या संघर्षाचे गंभीर परिणाम पहायला मिळत आहेत.
सीरियाच्या सैन्याने पूर्वी घोउटा शहरामधील हावश अल-दवाहिरावर आपलं नियंत्रण मिळवलं आहे. घोउटी शहरामध्ये लढाऊ विमानातून बॉम्ब टाकण्यात आल्याने तेथे मृतदेहांचा खच पडल्याचं दिसत आहे.
सतत होत असलेल्या बॉम्ब हल्ल्यात अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये अनेक निश्पाप नागरिकांचाही बळी गेला असून त्यात महिला आणि बालकांचाही समावेश आहे.
सीरियातील घोउटा शहराची लोकसंख्या जवळपास चार लाख आहे. गेल्या पाच दिवसांत या शहरात ११४६ बॉम्ब फेकण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. या हल्ल्यात तब्बल ५०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
बंदुकीची गोळी आणि बॉम्ब ज्यावेळी सोडण्यात येतात त्यावेळी समोरचा व्यक्ती कोण आहे आणि कुणाला लागणार हे आपण सांगू शकत नाही. मात्र, सत्ता आणि ताकद याच्या जोरावर कुणीही काहीही करत आहे. तसाच प्रकार सीरियात पहायला मिळत आहे. सीरियात आतापर्यंत ५०० नागरिकांचा मृत्यू झालाय. ज्यामध्ये १३० लहान मुलांचा समावेश आहे.