Swiss Bank: काळ्या पैशाची बँक बुडाली? सुमारे 143 अब्ज डॉलरचं आर्थिक नुकसान

Swiss Bank: जगातील सर्वात मोठ्या बॅंकेला आर्थिक फटाका बसला आहे. सध्या यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ माजली आहे. 

Updated: Jan 10, 2023, 08:13 PM IST
Swiss Bank: काळ्या पैशाची बँक बुडाली? सुमारे 143 अब्ज डॉलरचं आर्थिक नुकसान title=
Swiss Bank

Swiss Bank: काळा पैसा ठेवणाऱ्यासाठी स्विस बँक महत्त्वाची आबे. मात्र, ही बँक आता डबघाईला आल्याचं समोर आलं आहे. अनेक मोठ्या व्यक्तींचे आणि उद्योगपतींचे खातं असणाऱ्या स्विस बँकला इतिहासातला (Swiss Bank Economic Crisis) मोठा फटका बसला आहे. रॉयटर्स (Reuters) वृत्त संस्थेनं याबाबतील अधिक खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्विस बॅंकचे नावं चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा या बॅंकेचे नाव चर्चेत आलं आहे. स्विस नॅशनल बँकेला गेल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला आहे. बँकेने सोमवारी याविषयीची माहिती पोस्ट केली आहे. रॉयटर्स वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्विस नॅशनल बँकेला 2022 मध्ये 132 अब्ज स्विस फ्रँक म्हणजे 143 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. बँकेच्या 116 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे. (Swiss central bank posts biggest 143 billion dollar loss in its 116-year history in 2022 World News Marathi)

प्राथमिक आकडेवारीचा हवाला देऊन स्विस नॅशनल बँकेने सोमवारी 2022 आर्थिक वर्षासाठी 132 अब्ज स्विस फ्रँक ($143 अब्ज) चे नुकसान नोंदवले. हे मध्यवर्ती बँकेच्या 116 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठे नुकसान दर्शवते आणि स्वित्झर्लंडच्या अंदाजे 18% 744.5 अब्ज स्विस फ्रँक्सच्या (Swiss Frank) अंदाजे सकल देशांतर्गत उत्पादनाच्या बरोबरीचे आहे. 2015 मध्ये त्याचे पूर्वीचे रेकॉर्ड नुकसान 23 अब्ज फ्रँक होते. 

स्विस बॅंक काय म्हणते? 

बँकेने याविषयी पोस्ट करताना म्हटले आहे की, स्टॉक (Stocks) आणि स्थिर उत्तपन्न बाजारातील घसणीमुळे त्यांचे शेअर्स आणि बाँड पोर्टफोलिआच्या (Board Portfolio) मुल्याला नुकसान पोहोचले आहे. त्याचबरोबर मजबूत होत असलेल्या स्विस फ्रँकचाही नकारात्मक परिणाम झाला आहे. फ्रँक वाढल्याने विदेशी चलन पोझिशनवर 131 अब्ज फ्रँक आणि स्विस फ्रँक पोझिशन्सवर 1 अब्ज गमावले. परिणामी स्विस बँक आता स्विस सरकार आणि सदस्य राष्ट्रांना नेहमीसारखे पेआउट करणार नाही.

हेही वाचा - Union Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?

अर्थतज्ज्ञ काय म्हणाले? 

स्विस बँकेला नुकसान झाले असले तरीही या नुकसानीचा SNB धोरणावर परिणाम होण्याची शक्यता नाही. 2022 मध्ये चेअरमन थॉमस जॉर्डन यांनी उच्च स्विस चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदरात तीन वेळा वाढ केली, असे विश्लेषकांनी सांगितले तर जे. साफरा सारासीन (J. Safra Sarasin) चे अर्थशास्त्रज्ञ कार्स्टेन ज्युनियस म्हणाले, एसएनबी (SNB) ची उच्च प्रतिष्ठाच तिला यामध्ये मदत करते की त्याला काहीही बदलण्याची गरज नाही. 

स्विस बँकेला झालेल्या तोट्याचे वेगवेगळ्या आर्थिक दृष्टिकोनातून याचे विश्लेषण करण्यात येत आहे. एसएनबी (SNB) वर गेल्या वर्षी त्याच्या स्टॉक आणि बाँड पोर्टफोलिओमध्ये झालेल्या नुकसानीमुळे बाजारातील व्यापक मंदीचा परिणाम झाला होता. मजबूत स्विस फ्रँक ते जुलैमध्ये युरोच्या तुलनेत समतेच्या वर वाढले. विनिमय दराशी संबंधित नुकसानास कारणीभूत ठरले. एसएनबी (SNB) चे सोने 2021 च्या शेवटी 1,040 टन होते आणि 2022 मध्ये 400 दशलक्ष फ्रँक वाढले होते.