धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राफ्ट अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?

बोईंगच्या स्टारलाईनर अकार्यक्षम ठरले आहे. यामुळे आता थेट पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात येईल.

वनिता कांबळे | Updated: Sep 15, 2024, 07:56 PM IST
धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राफ्ट अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?  title=

Sunita Williams Boeing Starliner Spacecraft : भारतीय वंशाच्या अंतराळवीर   सुनीता विल्यम्स या तिस-यांदा गेल्या अंतराळ मोहिमेवर गेल्या आहेत.  फक्त आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या  नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स  या आता तब्बल आठ महिन्यांसाठी अंतराळात अर्थात स्पेस स्टेशनवर अडकल्या आहेत. आता फेब्रुवारी 2025 मध्येच त्या पृथ्वीवर परतू शकतात अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्पेस स्टेशनवर  सुनीता विल्यम्स या सध्या तरी सुरक्षित असल्या तरी NASA च्या या मोहिमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राक्टमधून अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला? अशा अनेक प्रश्नांमुळे ही मोहिम वादात सापडली आहे. 

5 जून 2023 रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आणखी एक नवा इतिहास रचला. बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टने पृथ्वीवरून उड्डाण केले. या स्पेस क्राफ्टमधूनच  सुनीता आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे स्पेसटेशनवर गेले. प्रक्षेपणानंतर 26 तासांनी गुरुवारी रात्री 11 वाजता बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्ट स्पेश स्टेशनवर पोहचल्या.

आठ दिवसांची मोहिम फत्ते करुन मुख्य प्लान नुसार सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर  15 जूनला पृथ्वीवर परतणार होते.   22 जूनला त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यानंतर 9 जुलैला देखील स्पेसक्राफ्ट डॉक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर नासा क्रू मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी दिलेल्या अपडेट नुसार स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट हे 45 दिवसांपर्यंत स्पेस स्टेशनवर डॉक केले जाऊ शकते असे जाहीर करण्यात आले.  सर्व प्रयत्न अपयशी ठरले. स्टारलायनरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने गेल्या आठवड्यात सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांच्याविना ते पृथ्वीवर परतले आहे.  सुनिता विलियम्स आणि विल्मोर फेब्रुवारी 2025 मध्ये एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्समधील क्रू-9 च्या यानातून परतणार आहेत. 

स्टारलाईनर स्पेसक्राक्ट बिघाड झाल्याची नासाला आधीच माहिती होती?

स्टारलाईनर स्पेसक्राक्ट बिघाड झाल्याची नासाला आधीच माहिती होती अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. केनेडी स्पेस सेंटर इथून बोइंग स्टारलाइनर हे नवं अंतराळयान सुनीता यांना घेऊन अंतराळात उड्डाण करण्याआधीच तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. उड्डाणाच्या फक्त 90 मिनिटं आधी मोहीम रद्द करावी लागलीय. नासानं दिलेल्या माहितीनुसार, अंतराळयानातला ऑक्सिजन रिलीफ व्हॉल्व व्यवस्थित काम करत नव्हता. त्यामुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली. तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टने 5 जून रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले. मात्र,  हेलियम वायूची गळती हा किरकोळ तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत  बोईंग स्टारलाइनर लाँच केले. पृथ्वीच्या वातावरणात परत येताना वेग कमी करण्यासाठी हेलियमचा वापर केला जातो.   सुनिता विलियम्स आणि विल्मोर फेब्रुवारी  यांना अंतराळात घेऊन जाणारे हे यान   टेस्टिंग स्पेसक्राक्ट होते. या स्पेसक्राफ्टमध्ये आलेल्या तांत्रिक त्रुटींची कल्पना नासाला होती. बोईंग स्टारलाइनर ही कंपनी नेहमीच वादात सापडली आहे. या कंपनीच्या फ्लाईटच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. असे असताना NASA vs सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राक्टमधून अंतराळात का पाठवले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.