Leader : केईएम रूग्णालयातील विद्यार्थी बनला आयर्लंडचा पंतप्रधान

त्यांचे वडील मुंबईला आणि आमच्या गावी वराडला नेहमी जातात.

Updated: Nov 1, 2021, 06:34 PM IST
Leader : केईएम रूग्णालयातील विद्यार्थी बनला आयर्लंडचा पंतप्रधान  title=

मुंबई : ही सक्सेस स्टोरी आहे मुंबईतील त्या विद्यार्थ्याची ज्याने आयर्लंडच्या पंतप्रधान पदी आपलं अस्तिव निर्माण केलं. पण तुम्ही म्हणाल, आयर्लंडच्या पंतप्रधानांचा भारताशी कसा संबंध, तर त्याचं कारण म्हणजे लिओ वराडकर यांनी स्पर्धक गृहनिर्माणमंत्री सिमॉन कोवेनी यांना 60 टक्के मतांनी हरवत 2017 मध्ये फाईन गेल पक्षाला सर्वात मोठा जनाधार असलेला पक्ष म्हणून सिध्द केले. 

मध्य उजव्या पक्षाच्या ऐंडा केनी यांच्या नंतरचे ते सर्वात तरूण पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करत होते आणि त्यांनी पहिले गे (समलिंगी) पंतप्रधान म्हणून देखील इतिहास रचत आहेत. एका वृत्तानुसार, ते आयरिश परिचारिकेचे पूत्र आहेत, आणि व्यवसायाने डॉक्टर आहेत ज्यांना भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळली आहे. वराडकर यांची पार्श्वभुमी, वय आणि लैंगिकता हा त्यात चर्चेचा विषय ठरला.

त्यांची बहिण शुभदा वराडकर ज्या प्रसिध्द औडिसी नृत्यांगना आहेत, म्हणाल्या की, “ आम्ही स्वातंत्र्यसैनिकाच्या घरातले आहोत ज्यांनी 1960 च्या दशकात मुंबईतून आयर्लंडमध्ये स्थलांतर केले, त्यांचे वडील अशोक यांनी आयरिश परिचारीका मरियम यांच्याशी विवाह केला. लिओ देखील वैद्यकीय डॉक्टर आहे, त्यांचे वडील मुंबईला आणि आमच्या गावी वराडला नेहमी जातात.

 लिओ देखील येतो. ऐवढेच नाही तर त्याने त्यांचे प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षण केईएम रूग्णालयात पूर्ण केले. ज्यावेळी तो क्रीडामंत्री होता, तो आयरिश क्रिकेट संघासोबत मुंबईला आला होता. आमचे मोठे कुटूंब आहे. ज्यावेळी आयरिश बाजूचे कुटूंबिय मुंबईला येतात माझ्या घरी येतात आमचा 60 पेक्षा जास्त नातेवाईकांचा मेळावाच मग आमच्या बोरीवलीच्या घरी भरतो”.

Leo Varadkar portrays himself as Ireland's lionhearted saviour — but is he?  | TheArticle

डब्लिनमध्ये अंतिम मते मोजण्यात आली त्यावेळी त्या म्हणाल्या की, “ लिओ म्हणाला होता की, त्याला आनंद झाला आहे, आणि त्याला यशाची खात्री आहे. ऐंडा केनी ज्यांनी लिओ यांच्यामुळे पराजय स्विकाराला ते म्हणाले होते की, “त्यांचा वराडकर यांना पूर्ण पाठिंबा आहे.

माध्यमांशी बोलताना लिओ यांनी त्याचा आनंद व्यक्त केला होता, “ आयर्लंडमध्ये सध्या बालपण व्यतीत करत मोठे होणारे प्रत्येक मूल आता, माझ्याकडे बघेल आणि मला वाटते माझ्या असंभव कहाणीचा आणि पार्श्वभुमीची प्रेरणा घेईल, आणि माझ्याबाबत सारे काही जाणून घेईल, काहीच नाही तरी निदान त्यांच्या स्वत:वरील विश्वास आणखीनं वाढेल ".

त्यांनी पुढे सांगितले की, "पक्ष म्हणून आमचे काम आहे की देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच प्रकारच्या संधी मिळतील कारण आमच्या देशात त्यांचा अभाव आहे. येथे संधीची असमानता आहे ती दूर केली पाहिजे मात्र पक्ष म्हणून मला समान संधीचे गणराज्य म्हणून या देशाला तयार केले पाहिजे.”