आर्थिक संकटानंतर पलायन केलेले श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा

Sri Lankan President Gotabaya Rajapaksa resigns :  श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे मालदीवची राजधानी माले येथे आश्रय घेतला होता. त्यानंतर त्यांनी सिंगापूर गाठले. गोटाबाया राजपक्षे यांनी आपला राजीनामा दिला आहे.

Updated: Jul 15, 2022, 08:28 AM IST
आर्थिक संकटानंतर पलायन केलेले श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा  title=

कोलंबो : Sri Lankan President Gotabaya Rajapaksa resigns : श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे मोठा गोंधळ माजला आहे. (Sri Lanka Economic Crisis) नागरिक रस्त्यावर उतरलेत. तर काही नागरिकांनी थेट राष्ट्रध्यक्षांच्या घराचा ताबा घेतला. त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून आंदोलकांना हुसकावून लावले. त्याआधी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे मालदीवची राजधानी माले येथे आश्रय घेतला होता. त्यानंतर त्यांनी सिंगापूर गाठले. गोटाबाया राजपक्षे यांनी आपला राजीनामा दिला आहे.

श्रीलंका अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेत नागरिकांनी जल्लोष साजरा केला आहे. सध्या श्रीलंकेत आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याची मदत घेण्यात आली आहे. देशात आर्थिक संकट उभे राहिले आहे. लोक महागाईने होरपळून निघाले. त्यातच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन केल्‍यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाली आहे. आता कोलंबोतील संसद भवनाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.  

गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन केल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक राष्ट्रपती भवनात घुसले होते. संतप्‍त आंदोलकांनी राष्‍ट्रपती आणि पंतप्रधानांच्‍या कार्यालयावर हल्‍लाबोल केला. आंदोलक आणि लष्‍कराचे जवान आमने-सामने आले होते. आंदोलकांनी राष्‍ट्रपती निवासात धुडगूस घातल्‍याचे व्‍हिडिओ व्‍हायरल झाले आहे. दरम्यान, आंदोलक पंतप्रधान यांच्‍या आसनावर कब्‍जा करु नये, यासाठी सुरक्षा जवान तैनात करण्‍यात आले आहेत.

गोटाबाया राजपक्षे सध्या सिंगापूरमध्ये असून तेथूनच त्यांनी हा राजीनामा मेल केला आहे. त्यांनी संसदेच्या अध्यक्षांना ही मेल केली आहे. 13 जुलै रोजी ते राजीनामा देणार होते, पण काल ​​ते मलेशियाला पळून गेले. यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली.

मलेशियानंतर बुधवारी पत्नीसह सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राजपक्षे यांनी आश्रय मागितला नाही किंवा त्यांना आश्रय दिला गेला नाही. ते सिंगापूरमध्ये 'खासगी दौऱ्यावर' आले आहेत. तेथूनही त्यांनी हा राजीनामा मेल केला आहे. त्याआधी ते एक दिवस मालदीवमध्ये राहिले होते. 

श्रीलंकेची अर्थव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्यानंतर झालेल्या विरोधामुळे राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढला. सौदी एअरलाइन्सचे फ्लाइट SV 788 राजपक्षे यांना घेऊन संध्याकाळी 7 वाजल्यानंतर (स्थानिक वेळ) काही वेळाने सिंगापूर चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.