VIDEO: दोन मिनिटांसाठी हातातला रिमोट बाजूला ठेवा! Spidermen तबला वाजवतोय

Spidermen Playing Tabla Video: स्पायडरमॅन तबला वाजवतो आहे असा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आवडत्या मालिका पाहणं, चित्रपट पाहणं एक मिनिटासाठी सोडून दिलं आहे. तुम्ही पाहिलात का? 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 9, 2023, 09:12 PM IST
VIDEO: दोन मिनिटांसाठी हातातला रिमोट बाजूला ठेवा! Spidermen तबला वाजवतोय title=
July 9, 2023 | spider man playing tabla video goes viral on instagram

Spidermen Playing Tabla Video: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे स्पायडरमॅन तबला वाजवतो आहे त्याची. सोशल मीडियावरून सध्या कधी काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही. त्यातून सततच्या रूटिन लाईफमधून काहीतरी वेगळं मिळावं म्हणून नेटकरीही युट्यूबवर काहीतरी वेगळं शोधताना दिसतात आणि अपलोडही करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. तो म्हणजे तुमचा लाडका स्पायडर मॅन जेव्हा उस्ताद बनून तबला वाजवायला लागतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे AI फोटोंची. जेव्हा त्यात आपल्याला असे असते तर? या प्रश्नांची उत्तरं मिळताना दिसतात. परंतु हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल, पाहा स्पायडरमॅनलाही तबल्याचा मोह आवरला नाही. 

गेली अनेक वर्षे आपण स्पाडरमॅन, बॅटमॅन यांचे सिनेमे पाहत मोठे झालो आहोत. फक्त लहान मुलांसाठीच किंवा तरूणांसाठीच वाटणारे हे चित्रपट सर्वच वयोगटातील प्रेक्षकांसाठी भाव खाऊन गेले आहेत. हातातून जाळं काढण्यात माहीर असलेला स्पायडरमॅन आता तबला वाजवताना दिसतो आहे. सोबतच दुश्मनांशी लढणारा आणि इथून तिथून उडी मारणारा हा स्पायडरमॅन आता संगीत वाद्यांमध्ये रमला आहे असं चित्र दिसत आहे. त्यामुळे सध्या हा स्पायडर मॅन तबला वाजवाताना दिसतो आहे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या तूफान प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा - VIDEO: ''नमस्ते! आप कैसे हैं?'' हॉलिवूडचा नायक जेव्हा हिंदीत बोलतो...

@amanpaltabla या युझरनं इन्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात एक व्यक्ती स्पायडरमॅन बनला आहे आणि तो चक्क तबला वाजवताना दिसतो आहे. त्यामुळे फॅन्स क्रेझी झाले आहेत. प्रत्यक्षात स्पाडरमॅन आणि तबला वाजवतोय यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नाहीये. हो ना... परंतु हे खरं आहे. स्पायडरमॅन बनत एका इसमानं ते सिद्ध करून दाखवलं आहे. 'स्पाइडर मैन रिटर्नस.' असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. यावेळी तो तीन तालवर तिरकीट कैधा वाजवतो आहे असं कॅप्शनध्ये लिहिलं आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला 88 हजाराहून अधिक लाईक्स आले असून हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांनी या व्हिडीओवर नानाविध कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे सध्या यावेळी फॅन्स प्रचंड क्रेझी झाले आहेत. यावेळी तो अगदी मनापासून जसं की कोणीतरी तयार तबलावादक आहे त्याप्रमाणे उत्सफुर्तपणे तबला वाजवतो आहे.