अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळणार? मोठा विनाश होणार? संशोधकांचा खुलासा

अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकते. याबाबत नासाने अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 30, 2023, 09:59 PM IST
अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळणार? मोठा विनाश होणार? संशोधकांचा खुलासा title=

NASA Deorbit The International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station अवकाशात तरंगत आहे. मात्र, हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळले तर मोठा विनाश होईल. अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळले तर नेमकं किती नुसकान होईल याबाबत NASA च्या संशोधकांनी खुलासा केला आहे. 

पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची  स्थापन केली आहे.  NASA ने International Space Station नष्ट अर्थात डिऑर्बीट करण्याचा निर्णय घेतला आहे. एका स्पेसक्राफ्टच्या मदतीने हे स्पेश स्टेशन नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, या प्रक्रिदरम्यान हे  International Space Station पृथ्वीवर कोसळण्याचा देखील धोका आहे. कारण, हे स्पेस स्टेशन अंतराळात स्थापित करणे आव्हानात्मक होते त्याचप्रमाणे स्पेस स्टेश  डिऑर्बीट करणे तितकेच धोकादायक आहे. 

'स्पेस टग' 

International Space Station नष्ट अर्थात डिऑर्बीट करण्याच्या प्रक्रियेला  'स्पेस टग'  असे म्हंटले जाते.  1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात International Space Station ची निर्मीती करण्यात आली. International Space Station चा कार्यकाळ हा 15 वर्षांचा होता. प्रत्यक्षात मात्र, गेली 24 वर्षे ते कक्षेत कार्यरत आहे. अशा स्थितीत हे नियंत्रणाबाहेर गेल्यास धोकादायक ठरु शकते. यामुळ  International Space Station  सुनियोजीत पद्धतीने  डिऑर्बीट  करणे गरजेचे आहे. 2031 पर्यंत International Space Station डिऑर्बीट  करण्याचे उद्दीष्ट आहे. 

International Space Station डिऑर्बीट करणे अत्यंत धोकादायक

International Space Station डिऑर्बीट करणे अत्यंत धोकादायक आहे. छोटीशी चूक देखील महागात पडू शकतो. या दरम्यान International Space Station पृथ्वीवर कोसळले तर मोठा विनाश होवू शकतो. International Space Station नष्ट करण्यासाठी खास स्पेसक्राफ्ट तयार केले जाणार आहे. US Deorbit Vehicle (USDV) असे या स्पेस क्राफ्टचे नाव असणार आहे.  यासाठी विशेष बजेटची तरतूद करण्यात आली आहे. International Space Station सुरक्षितरीत्या डिऑर्बीट करण्याची जबाबदारी या   US Deorbit Vehicle वर असणार आहे. US Deorbit Vehicle च्या मदतीने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उद्ध्वस्त करून योग्य विल्हेवाट लावली जाणार आहे. निर्मनुष्य प्रदेश अशी ओळख असलेल्या दक्षिण प्रशांत महासागरात हे स्पेस स्टेशन नष्ट करण्यात येणार आहे.