अमेरिकेनंतर भारतातही होणार नोकर कपात?

Oracle या सॉफ्टवेअर कंपनीने अमेरिकेत कर्मचाऱ्यांची नोकर कपात सुरु केली आहे. एका रिपोर्टनुसार असं सांगण्यात येतंय की, भारतातही ही कंपनी लवकरच नोकर कपात करु शकते.  

Updated: Aug 6, 2022, 04:32 PM IST
अमेरिकेनंतर भारतातही होणार नोकर कपात?   title=

मुंबई : आयटी क्षेत्रातील नामांकित असलेल्या Oracle Corp या कंपनीने अमेरिकेत कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार Oracle कंपनीने जागतिक स्तरावर हजारों कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यासंबंधी योजना बनवत आहे. असं सांगितलं जातयं की, Oracle Corporation या सॉफ्टवेअर कंपनीचा तब्बल 1 बिलिअन डॉलर कॉस्ट कटिंगवर फोकस आहे.

कंपनीकडे किती कर्मचारी आहेत?

31 मे पर्यंतच्या आकड्यानुसार, Oracle Corporation  कंपनीकडे सध्याच्या घडीला 143000  फुल टाईम कर्मचारी काम करतात. लेटेस्ट अ‍ॅन्युअल रिपोर्टनुसार हा डाटा जाहीर केला आहे.

रिपोर्टनुसार, अमेरिकेत किती कर्मचाऱ्यांना Oracle कंपनी नोकरीतून काढून टाकणार आहे हे सांगण्यात आलं आहे. रॉयटर्सने या विषयी कंपनीला विचारलं, पण कंपनीकडून अद्याप कोणतही उत्तर मिळालेलं नाही.

भारत आणि कॅनडा मध्ये देखील होऊ शकते नोकर कपात...

रिपोर्टनुसार, Oracle Corporation ही कंपनी भारत, कॅनडा आणि युरोपमध्ये देखील येणाऱ्या काळात नोकर कपात करु शकते. याशिवाय, महागाईच्या भीतीने मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट आणि अ‍ॅप्पल सारख्या मोठ्या कंपन्यांनाची नोकर भरती करण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.