तुम्हालाही आलाय का असा मेसेज, वेळीच व्हा सावध!

तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याप्रमाणे सायबर क्राइम करणारे भामटेही नवनवीन युक्ती शोधून काढत आहेत. 

Updated: Aug 6, 2022, 04:02 PM IST
तुम्हालाही आलाय का असा मेसेज, वेळीच व्हा सावध! title=

Crime News : सायबर गुन्ह्यांचं प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढू लागलं आहे. जसजसं तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याप्रमाणे सायबर क्राइम करणारे भामटेही नवनवीन युक्ती शोधून काढत आहेत. परदेशामध्ये आता एक नवीन ऑनलाईन फ्रॉड समोर आला आहे.

परदेशात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. ऑस्ट्रेलिया देशात जवळपास वीस लाख डॉलर्सची लूट लोकांकडून करण्यात आली आहे.  ऑस्ट्रेलियामध्ये या फ्रॉडला 'Hi Mum'  म्हटलं जात आहे. ज्या लोकांची फसवणूक झाली त्यामध्ये 55 वर्षांच्या वरील लोकांचा समावेश आहे.

भामटे अशी करतात फसवणूक
फसवणूक करणारे लोकांना एका अज्ञात मोबाईल नंबरवरून मेसेज करतात. त्यामध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी असल्याचा ते सांगतात. माझा फोन हरवला असून जुना फोन नंबर डीलिट करा आणि नवीन नंबर सेव्ह करा. जर या संभाषणाला एखादी पीडित व्यक्ती फसली की ते नंतर पैशाची मागणी करतात.

जितके फ्रॉड झाले त्यामध्ये सर्वाधिक वयस्कर लोक बळी पडले. याचाच फायदा घेत आरोपी त्यांना पैसे मागतात. उदाहरण देताना माझ्याकडे आता ऑनलाईन व्यवहारासाठी काहीच नाही. नवीन फोनवर ऑनलाईन बँकिंग काम करत नसल्याचं ते सांगतात. त्यामुळे आपल्या पाल्याची गैरसोय होऊ नये म्हणून ते जास्त विचार न करता पैसे पाठवतात.

55 वर्षांच्या वरील लोक म्हणजेच जे पालक  आपल्या मुलांना पैस पाठवतात. ते आई-वडिल या घोटाळ्याचे शिकार अधिक संख्येने झाले आहेत. मात्र मे महिन्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये या प्रकरणांची वाढ झाली असल्याचं ऑस्ट्रेलियाचे सायबर क्राइमचे अधिकारी मॅथ्यू क्राफ्ट यांनी सांगितलं.

दरम्यान, जे लोक या घोटाळ्याचे शिकार झाले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या बँकेशी संपर्क करावा. याबाबत पोलिसांकडे तक्रार करावी.