जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम 'डाऊन'

'हा' संदेश समोर येत असल्यामुळे नेटकरी हैराण 

Updated: Apr 14, 2019, 05:31 PM IST
जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम 'डाऊन' title=

मुंबई : सोशल नेटव्हर्किंग साईट्समध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही माध्यमांची सेवा बरीच दिरंगाईने सुरु आहे. रविवारी दुपारपासून नेटकऱ्यांमध्ये याविषयीच्या चर्चा पाहायला मिळाल्या. फेसबुकच्या माध्यमातून कोणतंही अकाऊंट किंवा लिंकवर क्लिक केलं असता 'This site can`t be reached', असा संदेश दिला जात आहे. 

प्रथमत: इंटरनेटची गती मंदावल्यामुळे ही समस्या उदभवल्याचा अंदाज अनेक ठिकाणी वर्तवण्यात आला होता. पण, आता मात्र जगभरातून फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवा काही काळासाठी खंडीत झाल्याचं स्पष्ट होत आहे.  #WhatsAppDown #FacebookDown #InstagramDown  असे विविध हॅशटॅगही ट्रेंड करत असून, लवकरात लवकर या सेवा सुरळीत होण्याच्याच दृष्टीने पावलं उचलली जात असल्याचं कळत आहे. 

 

अधिकाधिक चर्चा आणि दैनंदिन जीवनशैलीचा अमुलाग्र भाग झालेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबतच व्हॉट्स अॅप या मेसेजिंग सेवा पुरवणाऱ्या माध्यमातही काही त्रुटी असल्याची तक्रार काही नेटकऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे एकंदरच या 'डाऊन' प्रकरणामुळे नेटकरी मात्र त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.