स्लोवेनिया : गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सतत वाढ होत आहेत. पण आताच्या घडीला असे काही शहरं समोर येत आहेत, त्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. सध्या यूरोपमधून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. युरोपमधील स्लोवेनिया देश कोरोना मुक्त झाल्याची घोषणा युरोपातील अधिकाऱ्यांनी केली आहे. युरोपीय संघाचे सदस्य स्लोवेनिया सरकारने देशात कोरोना नियंत्रणात आल्याची घोषणा केली आहे.
यावेळी युरोपचे पंतप्रधान जनेझ जानसा (Janez Jansa) म्हणाले की, 'यूरोपातील सद्य स्थितीकडे पाहिले तर स्लोवेनिया देश अधिक सुरक्षित आहे. गेल्या १४ दिवसांची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता स्लोवेनिया कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे.' स्लोवेनिया देशातील ही बातमी संपूर्ण जगाला दिलासा देणारी आहे.
त्याचप्रमाणे, स्लोवेनिया देशातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १४ दिवसांपासून याठिकाणी ७ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे लक्षात येताच लादण्यात आलेले काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.
The government continues to relax restrictions adopted due to the #COVID19 epidemichttps://t.co/fOcygAKBbs pic.twitter.com/n7yrlRJULM
— Slovenian Government (@govSlovenia) May 14, 2020
ऑस्ट्रिया, इटली आणि हंगरी येथून स्लोवेनियाला जाण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. पण जे नागरिक युरोपीय संघातील नाहीत त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
- प्राथमिक शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- सर्व प्रकारची दुकानं आणि ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
- सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.