Shower In Bedroom: बेडरुमच्या मधोमध शॉवर! जगभरात या घराची रंगली चर्चा

Design Of Home: तीन बेडरूमचे घर खास डिझाइनसाठी जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. यातील सर्वात खास आणि वेगळी गोष्ट म्हणजे त्याच्या बेडरूममध्येच शॉवर आहे.

Updated: Nov 18, 2022, 10:24 PM IST
Shower In Bedroom: बेडरुमच्या मधोमध शॉवर! जगभरात या घराची रंगली चर्चा title=

House With Shower In Middle Of Bedroom: प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर असावं. त्या घरात सर्व सुख सुविधा असाव्यात. जेव्हा गरज भासेल तेव्हा वस्तू आपल्या हाताशी आसाव्यात असं वाटत असतं. हाताशी पैसा असला की लोकं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. पण कधीकधी पैसा खर्च करूनही निराशा पदरी पडते. कारण तिथे राहायला गेल्यावर तिथल्या बांधकामापासून आतील सुविधा पाहून फसवणूक झाल्याचं कळतं. पण एका छोट्या घरासाठी लोकं कोट्यवधी रुपये मोजायला तयार आहेत, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. या घराची किंमत पाहून बिल्डरही आवाक् झाले आहेत. ही छोटसं घरं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेडरुममध्ये मधोमध शॉवर असल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. 

बर्मिंगहॅममधील तीन बेडरूमचे घर

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील बर्मिंघममधील हे तीन बेडरूमचे घर आपल्या खास डिझाइनमुळे जगभरात चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, रेबेका ग्लोवर नावाच्या महिलेने हे घर पहिल्यांदा ऑनलाइन पाहिले. ती स्वत:साठी घर शोधत असताना या घराबाबत माहिती मिळाली. एक खास टेरेस किचन आहे. पण त्यातील सर्वात खास आणि वेगळी गोष्ट म्हणजे त्याच्या बेडरूममध्ये असलेला शॉवर. हा शॉवर एका छोट्या जागेत व्यवस्थित बसवण्यात आला असून त्यासाठी खास जागा बनवण्यात आली आहे.

बातमी वाचा: Video: विमानाच्या कॉकपिटमधील खिडकीतून बाहेर डोकावला पायलट, कारण वाचाल तर डोक्यावर हात माराल

बेडरूममुळे किंमतीत वाढ

रिपोर्टनुसार, हे घर गॉर्डन जोन्स इस्टेटच्या एजंटांनी विकले आहे आणि बेडरूममुळे वाढली. हे घर 175000 पौंड म्हणजेच दीड कोटी रुपयांना विकले गेले. किमतीमुळे हे घर जगभरात चर्चेचा विषय बनले आहे.