Crime News : एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. बलात्काराच्या आरोपापासून वाचण्यासाठी आरोपीने पीडितेच्या भावाला आपल्या बहिणीवर बलात्कार करण्याची परवानगी दिली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील 12 जणांना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतातील ही घटना आहे. एका नराधमाने परिसरातील एका मुलीवर अत्याचार केला. मुलीने घडलेली घटना कुटुंबियांनी सांगितली. पीडित मुलीचे कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. आरोपीच्या कुटुंबियांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधत नुकसान भरपाई देण्याची ऑफर दिली. पण पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्याकडे याहून संतापजनक मागणी केली.
पीडित मुलीच्या भावाला आरोपीच्या बहिणीवर अत्याचार करण्याची परवानगी दिली तरच आम्ही केस मागे घेऊ अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांना केली. धक्कादायक म्हणजे आरोपीच्या कुटुंबियांनी सहमती दर्शवली. दोन्ही कुटुंबातील 12 लोकांमध्ये यासंदर्भात बोलणी झाली आणि ठरल्यानुसार पीडितेच्या भावाने आरोपीच्या बहिणीवर अत्याचार केला.
असा झाला खुलासा
हे सर्व प्रकरण दोन कुटुंबियांमध्ये झाल्याने याबाबत बाहेर कोणालाच याबाबत माहिती नव्हती. पण जेव्हा पीडिते मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकातील तक्रार अचानक मागे घेतली तेव्हा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. अत्याचाराच्या बदल्यात अत्याचाराची ही संतापजनक घटना उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. यानंतर दोन्ही कुटुंबातील 12 जणांना अटक करण्यात आली.
पाकिस्तानात कायदा धाब्यावर
पाकिस्तानातील ही पहिली घटना नाहीए. याआधी पाकिस्तानातल्या मुलतान शहरात एका 16 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यता आला होता. यानंतर पंचायत बोलवण्यात आली. पीडितेचा भावाला आरोपीच्या 12 वर्षांच्या बहिणीवर अत्याचार करण्याचा आदेश देण्यात आला.