जगातील सर्वात विचित्र आजार, नाचताना 400 जणांनी गमवावा आपला जीव, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सर्वप्रथम एक तरुणी या आजाराच्या विळख्यात आली.

Updated: Nov 17, 2021, 03:42 PM IST
जगातील सर्वात विचित्र आजार, नाचताना 400 जणांनी गमवावा आपला जीव, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

पॅरिस : कोरोना महामारीनंतर जगभरात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागला आहे. कोरोना व्हायरस येण्यापूर्वी असा कोणता आजार येईल आणि ज्यामुळे जगभरात लाखो लोकांचे बळी जातील असे कुणाला वाटले होते का? आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका विचित्र आजाराविषयी सांगणार आहोत, ज्याच्‍यामुळे लोकांनी डान्‍स करताना आपला जीव गमावला आहे. हा गूढ आजार फ्रान्समध्ये 1518 मध्ये पसरला होता. आता या आजाराला 500 हून अधिक वर्षे उलटून गेली आहेत, तरीही शास्त्रज्ञांना हे रहस्य कळू शकलेले नाही.

1518 मध्ये पसरलेल्या या आजाराने फ्रान्समध्ये 400 हून अधिक लोकांना घेरले होते. त्याला डान्स एपिडेमिक म्हणतात.

अचानक एक मुलगी घरातून बाहेर आली आणि नाचू लागली.

सर्वप्रथम एक तरुणी या आजाराच्या विळख्यात आली. 1518 च्या जुलै महिन्यात एका तरुणीने अचानक नाचायला सुरुवात केली. या मुलीचे नाव फ्राऊ ट्रॉफी होते. नाचताना तिचे भान हरपले होते आणि ती नाचण्यात इतकी तल्लीन झाली होती की, ती नाचत नाचत घराबाहेर रस्त्यावर आली होती. फ्रॉला असा नाचताना पाहून आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटले.

फ्रॉलला असे विचित्र कृत्य करताना पाहून तिचे नातेवाईक तिला समजावण्यासाठी तेथे आले. परंतु उलट समजावण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी देखील तेथे नाचण्यास सुरुवात केली. बघता बघता तिथे लोकांची मोठी गर्दी जमली. यानंतर सर्वजण नाचू लागतात. मग अचानक काय होते हे कळत नाही, ज्यामुळे  नाचत असताना धडपडत लोक जमिनीवर पडू लागले आणि त्यांचा जीव जाऊ लागला.

नाचताना खाली पडून जीव गमवावा लागला

या घटनेदरम्यान डान्स करताना 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली, ज्यामुळे लोकं प्रचंड घाबरले आहेत. यानंतर फ्रान्सच्या अनेक भागात अशाच लोकांचा डान्स करताना मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

एका मागून एका शहरातून अशा नाचताना मरण्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. नंतर अशा लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फ्रान्सच्या या रहस्यमय घटनेबद्दल त्या काळातील शास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले होते, परंतु त्यांना त्याचे कोणतेही खरे कारण सापडले नाही. शास्त्रज्ञांनी या आजाराला 'डान्सिंग प्लेग' असे नाव दिले आहे. हळूहळू हा आजार आपसूकच संपला. आज या आजाराला 500 वर्षे उलटूनही शास्त्रज्ञ या आजाराचे रहस्य शोधू शकलेले नाहीत. आजही हे रहस्य रहस्यच राहिले आहे.