Pakistan Financial Crisis: काय सांगता, कंगाल पाकिस्तानमध्ये iPhone विकला जातोय इतका महाग? त्या किंमतीत एक कार येईल

Pakistan Inflation: पाकिस्तान या देशात सध्या फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आहे त्यामुळे सध्या सगळीकडेच महागाईचे संकट आले आहे. पाकिस्तान या देशात सध्या Iphone ची किंमत किती आहे हे वाचून तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. 

Updated: Feb 9, 2023, 04:47 PM IST
Pakistan Financial Crisis: काय सांगता, कंगाल पाकिस्तानमध्ये iPhone विकला जातोय इतका महाग? त्या किंमतीत एक कार येईल title=

Iphone 14 Price Hike in Pakistan: पाकिस्तानात सध्या हाहाकार माजला आहे. त्यातून सध्या या देशात खाण्यापिण्याचेही वांदे झाले आहेत. त्यातून सध्या या देशात मोठी आर्थिक चणचणही पाहायला मिळते आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या या देशात Apple iPhone 14 ला मोठा भाव चढल्याचे पाहायला मिळाले आहे. हो, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी परिस्थती सध्या पाकिस्तानात आहे. Apple iPhone 14 हा सर्वात खास आणि एडव्हान्स स्मार्टफोन आहे. गेल्या वर्षी Apple iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max एकत्रीत लॉन्च झाला होता. मात्र तुम्हाला माहित आहे का, पाकिस्तानात  iPhone 14 ची किंमत सुमारे 3 लाख रुपयांहून जास्त आहे. Apple iPhone 14 सीरिज गेल्या वर्षी लॉन्च झाली होती. या सीरिजमध्ये चार मॉडल अर्थात Apple iPhone 14, Apple iPhone 14 Plus, Apple iPhone 14 Pro आणि Apple iPhone 14 Pro Max चा समावेश आहे. (Shocking news apple iphone 14 costs for rs 3 to 17 lakh in pakistan check apple iphone 14 pro max price)

पाकिस्तानात किती आहे Apple iPhone 14 ची किंमत?

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानात Apple iPhone 14 ची किंमत 3,17,600 रुपयांवर पोहोचली आहे. तर 256GB स्टोरेज आणि 512GB स्टोरेज असलेल्या Apple iPhone 14 च्या इतर दोन मॉडलची किंमत 3,46,000 रुपये आणि 4,02,700 रुपयांवर पोहोचली आहे. भारतीय रुपया सध्या पाकिस्तानात 3.33  रुपयांच्या बरोबरीत चालू आहे. 

इतकी महागाई का? 

लोकांच्या अगदी सामान्य गरजांपासून ते त्यांच्या मोठ्या गरजांपर्यंत सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात तुटवडा आणि महागाई पाहायला मिळते आहे. पाकिस्तानात सध्या हाच प्रकार सुरू आहे. पाकिस्तानात मागणी प्रचंड वाढली असताना सगळ्यांच गोष्टींचा तुडवडा झाला आहे. त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे. एकतर जेव्हा मागणी वाढते तेव्हा महागाई वाढते आणि त्याचसोबत जेव्हा पुरवठा कमी होतो आणि मागणी वाढते तेव्हा मोठ्या प्रमाणात महागाईचा सामना करावा लागतो. अशावेळी महागाईचा फटाका हा सर्वसामान्यांना बसतो आहे. आणि हीच परिस्थिती ही सध्या पाकिस्तानात झाली आहे. सध्या यामुळे पाकिस्तान मोठ्या प्रमाणात कंगाल झाला आहे.  

पाकिस्तानात महागला iphone

पाकिस्तानात केवळ Apple iPhone 14 नाही तर Apple iPhone 14 Pro ची किंमत देखील गगनाला भिडली आहे. पाकिस्तानात Apple iPhone 14 Pro ची किंमत 3,97,000 रुपयांपासून सुरू होते. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानात Apple iPhone 14 Pro Max च्या 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,06,500 रुपये आहे. 

Apple iPhone 14 चं खास वैशिष्ट्य काय?

स्टँडर्ड Apple iPhone 14 मॉडल आणि Apple iPhone 13 मध्ये खूप साम्य आहे. परंतु कंपनीने Apple iPhone 14 Pro मॉडलमध्ये अनेक एडव्हान्स बदल केले आहेत. शानदार डिझाइन, 48MP कॅमेरा, A16 बायोनिक चिप आणि दमदार बॅटरी लाईफने हा स्मार्टफोन अपडेटेड आहे.

भारतात किती आहे Apple iPhone 14 ची किंमत?

भारतीय बाजारात Apple iPhone 14 हा 79,900 रुपये किमतीत लॉन्च झाला होता. Apple iPhone मॉडलची किंमत संबंधित देशातील करप्रणालीवर निर्धारित करत असतो.