धक्कादायक : होम स्टे मालकांने केले हजारो जोडप्याचे प्रायव्हेट video शूट, इथे लपवून ठेवला होता कॅमेरा

एलीने आपल्या होम स्टेमधील रुममध्ये सिक्रेट कॅमेरा लपवून ठेवला होता. त्याने कॅमेरा अशा प्रकारे सेटअप केला होता कि कोणालाही ते कळून आलं नाही

Updated: Oct 19, 2022, 06:46 PM IST
धक्कादायक : होम स्टे मालकांने केले हजारो जोडप्याचे प्रायव्हेट video शूट, इथे लपवून ठेवला होता कॅमेरा title=

Shocking Private Video Leak of couple:  दिवाळी अगदी तोंडावर आलीये. दिवाळीच्या सुट्या पडताच बऱ्याच जणांनी दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाण्याचं प्लांनिंग सुद्धा केलं असेल. (Diwali Holiday 2022) पण जर फिरायला जातच असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण तुम्ही फिरायला गेल्यानंतर राहण्यासाठी घर घेता. तेव्हा तुमची प्रायव्हसी खूप महत्त्वाची असते. कारण नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे. जे पाहून तुमच्या ही पायाखालची जमीन सरकू शकते. कारण अशा ठिकाणी तुमचे प्रायव्हेट व्हिडीओ शूट करुन ते व्हायरल सुद्धा केले जावू शकतात. (shocking be alert if you are staying in hotels you are being fimed by spy cam )

तुम्ही जे वाचलत ते अगदी खरं आहे, कारण  हा संताप आणणारा प्रकार घडलाय वॉशिंग्टन शहरात. पोलिसांनी जय एली नावाच्या आरोपीकडून कॅमेरा, लॅपटॉप, टॅब आणि फोन जप्त केलाय. ज्यामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आणखी वाचा:  या दिवाळीत अशी करा स्वच्छता..सोप्या घरगुती उपायांनी चमकवा वस्तू 
 
काय आहे संपूर्ण प्रकरण 

होम स्टे मालकाने जवळपास दोन हजाराहून अधिक जोडप्याचं अश्लील व्हिडिओ शूट केलयं आणि ते सुद्धा हिडन कॅमेऱ्याने (hidden camera) गेल्या वर्षभरापासून तो कपल्सचे व्हिडीओ (couples private video) शूट करत होता. अमेरिकेतील टेक्सास शहरात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल 2000 हून अधिक जणांच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ शूट (Obscene Video) केल्याचा गंभीर आरोप होम स्टे मालकावर आहे. 

आरोपी हा एअरबीएनबी (Airbnb) या  सुप्रसिद्ध ऑनलाईन बुकिंग कंपनीत कामाला आहे. तो त्याचं घर होम स्टे  (home stay) साठी देत होता. त्याच्या घरी थांबलेल्या हजारो पाहुण्यांची प्रायव्हसीसोबत त्याने छेडछाड केली. त्याने जोडप्याची प्रायव्हेट व्हिडीओ शूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 

आणखी वाचा:''एकवेळ अन्नाशिवाय राहीन पण शारीरिक सुखाशिवाय..Samantha Ruth Prabhuने केला खुलासा..पाहा video

अमेरिकेतील टेक्सास (Texas America) शहरातून ही संतापजनक घटना समोर आलीये. जर तुम्ही Airbnb च्या साईटवरून बुकिंग केलंत तर ही कंपनी तुम्हाला राहण्यासाठी होम स्टे उपलब्ध करून देते. अमेरिकाच नाही तर अनेक देशात  या कंपनीच्या शाखा आहेत. ज्या खूप प्रसिद्ध सुद्धा आहेत.  (shocking be alert if you are staying in hotels you are being fimed by spy cam )

घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय आणि या व्यक्तीने उपलब्ध करून दिलेल्या प्रॉपर्टीस साईटवरून बॅन करण्यात आल्या आहेत. 
  
वर्षभरापासून सुरु होता हा प्रकार

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार  54 वर्षीय (Jay Allee) जय एलीने आपल्या होम स्टेमधील रुममध्ये  सिक्रेट कॅमेरा लपवून ठेवला होता. त्याने कॅमेरा अशा प्रकारे सेटअप केला होता कि कोणालाही ते कळून आलं नाही. पोलिसांनी जयकडून कॅमेरा, लॅपटॉप, टॅब आणि फोन जप्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून तो व्हिडीओ शूट करत असल्याचं आता समोरआलाय . 

होम स्टेमध्ये राहायला आलेल्या पाहुण्यांच्या प्रायव्हसी  (privacy of guest in hotel room) सोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. शिवाय सर्वांच्या भावना दुखावल्याचे सुद्धा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे कुठे फिरायला जात असाल आणि हॉटेलमध्ये  राहण्याचा प्लान असाल तर आधी सर्व गोष्टींची खातरजमा करून घ्या. जेणेकरुन तुमच्या प्रायव्हसीला धक्का लागणार नाही.