... म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात मारली डुबकी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमी आपल्या अनोख्या कामांसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते नेहमी चर्चेत असतात.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 20, 2018, 01:18 PM IST
... म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात मारली डुबकी title=

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमी आपल्या अनोख्या कामांसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते नेहमी चर्चेत असतात.

वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी एक अनोखं काम केलं आहे. पुतिन यांनी पारंपारिक पद्धतीने ख्रिश्चन लोकांचा सण 'एपिफनी' साजरा केला.

या सणाच्या दिवशी रितीरिवाजानुसार पुतिन यांनी अतिशय थंडीमध्ये देखील बर्फाच्या पाण्यात अंघोळ केली. 'एपिफनी' हा 'प्रभुप्रकाश' म्हणून साजरा केला जाणार सण आहे. जवळपास २०० वर्षापासून हा सण साजरा केला जातोय.

रशियामध्ये १८ मार्चला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. पुतिन पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. पुतिन हे कम्युनिस्ट शासनात मोठे झाले आहे. राष्ट्राध्यक्षाच्या रुपात ते रशियाच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पुतिन यांचा सायबेरियामध्ये एका तलावात मासे पकडतांना आणि २००९ मध्ये घोडसवारी करतांना दिसले होते. त्यावेळेस देखील त्यांचे शर्टलेस फोटो समोर आले होते.