बीजिंग : China Covid Lockdown: कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका चीनमध्ये वाढला आहे. चीनमधील सर्वात गजबजलेले आणि मोठे शहर शांघाईमध्ये (Shanghai) लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शहरातील 2.6 कोटी लोक लॉकडाऊनमुळे (Shanghai lockdown) घरात बंदीस्त झालेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी हे पाऊल उचललं गेले आहे. आता प्रत्येक घरात कोरोना चाचणीवर भर देण्यात येणार आहे, असे तेथील प्रशासनाने तसे जाहीर केले आहे. (Shanghai lockdown: Chinese city goes into two-phased lockdown as Covid spreads)
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात होत आहे. हॉकाँगनंतर आता शांघाईमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चीनला साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. चीनचे सर्वात मोठे शहर सोमवारपासून पाच दिवसांच्या चाचणीसाठी पूर्वेकडील अर्धा भाग बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी पश्चिमेकडील भागही अशाच प्रकारे बंद ठेवण्यात येणार आहे. लॉकडाऊन लावण्यामागचे कारण म्हणजे शहरात सलग तीन दिवसात दररोज रुग्णांची भर पडत आहेत. गुरुवारी 1,609, शुक्रवारी 2,267 आणि शनिवारी 2,676 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय.
रहिवाशांना घर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती असल्याशिवाय खासगी गाड्यांना रस्त्यावर परवानगी दिली जाणार नाही. आपत्कालीन वैद्यकीय गरजांची गरज असेल तर त्यातून सूट दिली जाणार आहे. या लॉकडाऊनमुळे शांघाईवर मोठा परिमाण होऊ शकतो. कारण कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे चीनमध्ये घबराट पसरली असून देशातील सर्वात मोठे शहर शांघाईमध्ये 26 दशलक्ष लोक लॉकडाऊन झाले आहेत. शांघाय शहरात विक्रमी रुग्ण समोर आल्यानंतर आता चीन सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. रविवारी शांघाईमध्ये कोरोनाचे 3,450 रुग्ण आढळले, जे देशातील एकूण प्रकरणांपैकी 70 टक्के आहे. या लॉकडाऊन अंतर्गत शांघाय शहराची पुढील नऊ दिवस दोन भागात विभागणी केली जाईल आणि त्यानंतर लोकांची मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाईल.
चीनने ही घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा शांघाई शहरातील अनेक भागात आधीच लॉकडाऊन आहे. या भागात स्थानिक लोकांना अनेक वेळा कोरोना चाचण्या करून अहवाल द्यावा लागतो. यापूर्वी शांघायमधील डिस्ने थीम पार्क बंद करण्यात आले होते. या महिन्यात चीनमध्ये 56 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत.