Viral Video : आजकाल सोशल मीडियाची सगळीकडे धूम आहे. लोकं सोशल मीडियासाठी अनेक व्हिडीओ काढताना आपल्याला दिसत असतात. सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहिला मिळतात. प्राणी आणि लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतात. यूजर्स सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेक वेळा जीवही धोक्यात घालतात.
प्राणी आणि लहान मुलं यामधील व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर अशा व्हिडीओचा खजिना सापडतो. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो पाहून तर तुमचा राग अनावर होईल.
प्राण्याचा तसा काही भरोसा नसतो. ते कधी कोणावर हल्ला करेल सांगा येत नाही. आपण अनेक वेळा ऐकले, वाचले असेल पाळीव कुत्र्यानेच मालकावर हल्ला केला ते. मग अशात फक्त एका व्हिडीओसाठी प्राण्यासमोर आपल्या चिमुकल्याला सोडलं हे कितपत योग्य आहे? या व्हिडीओमध्ये पालकाने जे काही केलं ते पाहून आग मस्तकात जाते.
या व्हिडीओत या वडिलाने आपल्या लहानशा मुलीला एका सी-लायनच्या पाठीवर बसवलं. त्यानंतर जे काही झालं ते पाहून या वडिलांच्या बुद्धीवर शंका निर्माण होते. या बापाने व्हिडीओसाठी आपल्या चिमुकल्या मुलीचा जीव धोक्यात घातला. ही मुलगी सी-लायनच्या पाठीवर बसली असता सी-लायन तिच्यावर हल्ला करतो आणि ती मुलगी खाली पडते. या हल्ल्यामुळे ती घाबरते आणि रडायला लागते. त्यावेळी तिला वाचविण्यासाठी एक माणूस धावून येतो. व्हिडीओमधील हा माणूस तिचा वडील आहे का हे स्पष्ट नाही.
हा व्हिडीओ पाहून प्रत्येक पालकांना एकच संदेश आहे. फक्त एका फोटो किंवा व्हिडीओसाठी मुलांना कुठल्याही संकटात टाकू नका. हा व्हिडीओ रेडिटवर शेअर करण्यात आला आहे. 5 सेकंदचा हा व्हिडीओ आपल्या अंगावर शहारे आणतो. हा व्हिडीओ पाहून यूजर्सकडून संतापजनक कमेंट्स करण्यात येत आहे. एक यूजर म्हणतो, ''हा माणूस मुर्ख आहे का?, या माणसावर मुलाला धोक्यात घालण्याचा आरोप केला पाहिजे.'' तर दुसरा यूजरचं म्हणं आहे, ''मुलगी भाग्यशाली आहे कारण या सी-लायन तिच्यावर हल्ला न करता तिला आपल्या पाठीवरून उतरण्यासाठी प्रोत्साहन केलं.''