सिंहाच्या कळपाने मारली मगरीवर झडप...पुढे काय झालं पाहा हा Video

या व्हिडीओमधील सिंह आणि मगरीची झुंज पाहून अंगावर काटा येतो.

Updated: Jul 14, 2022, 12:27 PM IST
सिंहाच्या कळपाने मारली मगरीवर झडप...पुढे काय झालं पाहा हा Video  title=

Viral Video :  सोशल मीडियावर आपण प्राण्याचे लढाईचे व्हिडीओ पाहत असतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर युजर्सकडून पाहिला जात आहे. सिंह हा जंगलाचा राजा. त्याचाशी जंगलातील कुठलाही प्राणी पंगा घेत नाही. सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे, त्यात सिंहाशी कुठल्या प्राण्याने पंगा घेतला ते पाहूयात. 

सिंहाला या प्राण्याने दिली जोरदार टक्कर

मगर हा प्राणीसुद्धा तसा खतरनाक आहे. मगरीच्या वाटेलाही कोणी जात नाही. पण या व्हिडीओमध्ये जंगलाचा राजा सिंह आणि भीतीदायक मगर यामधील जोरदार टक्कर पाहिला मिळते. नदीमधून एक मगर किनाऱ्यावर येते आणि तोच तिच्यावर एक सिंह झेप मारतो. बघता बघता अजून दोन सिंह त्याच्यावर झडप मारतात. या एकट्या मगरीवर हे सिंह तुटून पडतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. या जीवमरणाच्या लढाईत कोणीच हार मानत नाही. 

शेरास सव्वाशेर

या व्हिडीओमधील सिंह आणि मगरीची झुंज पाहून अंगावर काटा येतो. सिंह हा सगळ्यात शक्तीशाली प्राणी आहे. त्यात जर तीन सिंहानी एकत्र हल्ला केला तर मग काय होणार? ही मगर जीवाच्या आकांताने आपला प्राण वाचविण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मोठ्या हिम्मतीने ती या सिंहाशी दोन हात करत होती. काही क्षणासाठी वाटतं आता सगळं संपलं, पण क्षणार्थ ही मगर या सिंहावर शेरास सव्वाशेर ठरते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lions Daily (@lionsdaily_)

व्हिडीओ तुफान व्हायरल

35 सेकंदच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांचं मस्त मनोरंजन करताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख यूजर्सने पाहिलं आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या मिळत आहेत. काही लोकं आर्श्चय व्यक्त करत आहेत तर काही लोकं मगरीच्या विजयावर आनंद व्यक्त करत आहेत.