संशोधकांचा एलियन्सबाबत मोठा दावा, सांगितलं कधी होणार संपर्क

स्वित्झर्लंडमधील खगोलशात्राचा अभ्यास करणाऱ्या साशा क्वांज  यांनी याबाबतचं वक्तव्य केलेलं आहे. 

Updated: Sep 12, 2022, 09:09 PM IST
संशोधकांचा एलियन्सबाबत मोठा दावा, सांगितलं कधी होणार संपर्क title=

Communication with extra terrestrial creatures: आपण या अथांग ब्रह्माण्डात एकटे (lonely planet) आहोत की नाही याबाबत शास्त्रज्ञ सातत्याने शोधकार्य राबवत आहेत. अशात शास्त्रज्ञांच्या एका चमूने अत्यंत महत्त्वाचा दावा केला. माणूस लवकरच आपल्या सूर्यमालेबाहेरील (solar system) जीवनाचा शोध लावतील असं या टीमने म्हंटल आहे. याला जास्त काळ जाणार नाही तर केवळ 25 वर्षांमध्ये हे शक्य होईल असं शास्त्रज्ञ म्हणतात. सध्या तुमचं वय 25 असेल तर तुम्ही 50 वर्षाचे होईपर्यंत माणूस एलियन्ससोबत संपर्क साधू शकेल असं हे शास्त्रज्ञ म्हणत आहेत. 

स्वित्झर्लंडमधील खगोलशात्राचा अभ्यास करणाऱ्या साशा क्वांज  यांनी याबाबतचं वक्तव्य केलेलं आहे. त्यांच्या माहितीनुसार सध्या मानवाकडे एलियन्सना (traces of aliens) शोधून काढण्याची पर्याप्त यंत्रणा उपलब्ध असल्याचं म्हंटलं आहे. आपण ब्रह्माण्डात एकटे नाही, हे या उपकरणाच्या साहाय्याने समजू शकतं असं त्या म्हणतात. इतर ग्रहांवर देखील जीव असू शकतात. मात्र, आपल्या अत्यंत शोधून काढण्याची गरज असल्याचं हे संशोधक सांगतात. 

1995 मध्ये मानवाने आपल्या सौरमालेबाहेरील पहिला ग्रह शोधून काढला होता. आज माणसाने सौरमालेबाहेरील तब्बल 5000 पेक्षा अधिक ग्रहांचा शोध लावलेला आहे. सध्या आपण सौरमालेबाहेरील दररोज एक नवा ग्रह शोधून काढतो. मात्र आपल्या आकाशगंगेत 10 हजार कोटींपेक्षा जास्त ग्रह तारे असल्याचं संशोधक सांगतात. 

स्वित्झर्लंडमधील खगोलशास्त्रज्ञ साशा क्वांज म्हणतात की, "पृथ्वीप्रमाणेच असे अनेक ग्रह आहेत जे त्यांच्या सौरमालेत त्यांच्या ताऱ्यापासून योग्य अंतरावर असू शकतात. या ग्रहांवर पाणी सापडू शकतं. आपल्या सौरमालेच्या बाहेरील ग्रहांवर वातावरण आहे की नाही हे अद्याप आपण शोधून काढलेलं नाही. आपल्याला याबाबत माहिती शोधून काढावी लागेल, जेणेकरून भविष्यात आपल्याला या ग्रहांवर प्रोब पाठवता येईल. 

साशा क्वांज  यांनी याबाबत तेंव्हाच भाष्य केलेलं जेंव्हा जेम्स वेब टेलिस्कोपच्या ( James webb space telescope ) मदतीने गुरु ग्रहांपेक्षा 12 पट जास्त मोठा एक्सोप्लॅनेट HIP 65426B चं संशोधन केलं होतं. 

नोंद - वरील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. झी 24 तास या बातमीच्या सत्य असत्यतेबाबत हमी देत नाही

scientists from switzerland says in next 25 years man will communicate with extra terrestrial creatures