पतीने घटस्फोटास दिला नकार तर पत्नीने न्यूड होत 'हे' काम करण्याची दिली धमकी

आखाती देश सौदी अरेबियातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, घटस्फोटासाठी पत्नीने पतीला विचित्र धमकी दिली आहे.

Updated: Mar 25, 2022, 01:18 PM IST
पतीने घटस्फोटास दिला नकार तर पत्नीने न्यूड होत 'हे' काम करण्याची दिली धमकी  title=

दुबई : आखाती देश सौदी अरेबियातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, घटस्फोटासाठी पत्नीने पतीला विचित्र धमकी दिली आहे. पत्नीची धमकी ऐकून पतीकडे घटस्फोट घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

पतीने नग्नावस्थेत फिरण्याची दिली धमकी 

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या महिलेने तिच्या पतीला घटस्फोट देण्याची धमकी दिली. वारंवार सांगूनही जेव्हा पती घटस्फोट देत नव्हता. तेव्हा महिलेने पतीला धमकी दिली की ती नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरेल. या धमकीने बिथरलेल्या पतीने घटस्फोटाला लगेच सहमती दिली.

सौदी अरेबियात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ

सौदी अरेबियाच्या सांख्यिकी विभागाच्या जनरल अथॉरिटीनुसार, सौदी अरेबियामध्ये घटस्फोटाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, दर तासाला सात तलाकची प्रकरणे आहेत. गेल्या 10 वर्षांत घटस्फोटाच्या घटनांमध्ये 60 टक्के वाढ झाल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.