मुंबई : कर्मचारी ऑफीसमधून २ मिनिटं लवकर निघाला, म्हणून थेट पगारच कापला. होय असं घडलंय जपानमध्ये. अनेकदा ट्रेन पकडायची, घरचं काम किंवा लवकर आलोय म्हणून लवकर निघालो, असं सांगत कर्मचारी ऑफीसमधून लवकर निघतात. मात्र जपानमध्ये असं अजिबात चालत नाही.
जपानी मीडिया द सांकेई न्यूजने दिलेल्या माहितीनुसात मे २०१९ ते जानेवारी २०२१ या कालावधीत ३१६ वेळा कर्मचारी आपल्या कार्यालयातून २ मिनिटं लवकर निघाले आहेत. आणि त्यामुळे थेट त्यांची वेतन कपात करण्यात आली आहे.
ऑफीसमधून लवकर निघण्यासाठी त्यांच्याकडे तसं ठोस कारण होतं, मात्र तरीही सरकारी नियम असल्याने कर्मचाऱ्यांचं कुणीही ऐकून घेतलं नाही.
आपले कर्मचारी ऑफीसला कधी येतात आणि कुठल्या वेळेत निघतात, याकडे त्यांचं अगदी नीट लक्ष असतं. जापानच्या चीबा प्रांतातील फुनाबाशी सीटी बोर्ड ऑफ एज्युकेशनचे नियम पाहाल, तर तुम्हालाही थक्क व्हायला होईल.
त्यांनी आपल्या अशा कर्मचाऱ्यांवरही नजर ठेवलेली, जे हजेरी लावताना चुकीची वेळ लिहायचे. याविरोधात बोर्डाने त्यांना शिक्षा म्हणून कर्मचाऱ्याच्या तीन महिन्यांच्या पगाराचा १० टक्के हिस्सा कापला. या कर्मचाऱ्यांची निघण्याची वेळ ५ वाजून १७ मिनिटं होती, मात्र ते ५ वाजून १५व्या मिनिटालाच ऑफीसमधून बाहेर पडले. म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
The Funabashi City Board of Education has disciplined a female assistant manager of the Lifelong Learning Department's branch office by reducing her salary by one-tenth (three months) for repeatedly leaving two minutes before the end of the regular https://t.co/937umMMgrx
— DeepL 翻訳を使って何となく翻訳されているアカウント。 (@6rXN9WIuBFrrFUW) March 10, 2021
जपानी लोक शिस्तबद्धतेसाठी ओळखली जातात. तिथे सरकारी कर्मचाऱ्यांनीही तेवढंच काम करावं लागतं, जेवढं खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना. इथे फक्त कामाचंच लक्ष्य नसतं. तर कंपनीला ठरल्याप्रमाणे संपूर्ण वेळ देणंही बंधनकारक असतं.