Russia's Moon Mission: भाराताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा पार पडला आहे. चांद्रयान 3 चे प्रॉपल्शन मॉड्युलपासून विक्रम लँडर वेगळं झाले आहेत. यामुळे आता चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे. भारताची चांद्रयान 3 यशस्वी टप्प्यात आली असतानाच तिकडे रशियाच्या मून मिशन संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. रशियाचे Luna-25 यान 6 दिवसाच्या आत चंद्राच्या कक्षेत पोहचले आहे. सध्या रशियाचे Luna-25 आणि भारताचे चांद्रयान 3 चंद्राभोवती घिरट्या घालत लँडिगसाठीची तयारी करत आहे. भारताच्या चांद्रयान 3 आधी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचे रशियाचे प्रत्नय आहेत.
भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियानंही आपलं यान चंद्राच्या दिशेनं पाठवले आहे. रशियानं 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच चंद्रावर यान पाठवले आहे. भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता रशियाचे Luna-25 हे यान अवकाशात झेपावले. रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला 5550 किमी अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथील अंतराळ केंद्रातून रशिया सोयुझ-2 सर्वात उंच आणि अत्यंत पावरफुल रॉकेटच्या मदतीने हे यान प्रक्षेपित करण्यात आले. यामुळे हे यान थेट चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत अवघ्या 6 दिवसात चंद्राच्या कक्षेत पोहचले आहे. पुढील पाच दिवस लुना-25 चंद्राभोवती फिरणार आहे. यानंतर 21 ऑगस्टला ते दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल अशी माहिती रशियन स्पेस एजन्सीने दिली आहे. चंद्रयान-3 आधी हे रशियन यान लँड होणार आहे. दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागावरील गोठलेल्या बर्फाचा अभ्यास हे यान करणार आहे.
भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेनं आणखी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून चांद्रयानाचा विक्रम लँडर यशस्वीरित्या वेगळा झाला आहे. इस्रोने ट्वीट करत चांद्रयान-3 संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. चंद्रावर ज्या ठिकाणी विक्रम लँडर उतरणार आहे त्या जागेचं छायाचित्रही इस्रोनं शेअर केले आहे. मॉड्युलपासून लँडर वेगळा झाल्यानंतर आता चांद्रयान-3 चंद्रापासून 100 किलोमीटरच्या कक्षेत पोहचेल. लँडर आपल्या थ्रस्टर्सचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 30 किमी उंचीवर लँडिग करेल. सुरक्षित लँडिंगसाठी अचूक नियंत्रण आणि नेव्हिगेशन आवश्यक आहे. त्यासाठी चंद्रयान 3 ची कक्षा काल घटवण्यात आलीय, त्यासाठी रॉकेट फायर केले गेले. 40 दिवसांच्या प्रवासानंतर 23 ते 24ऑगस्ट दरम्यान चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. दरम्यान चांद्रयानाच्या लँडिंगवेळी पंतप्रधान मोदी व्हर्चुअली उपस्थित राहणार आहेत. मोदी त्याचदरम्यान दक्षिण आफ्रिका दौ-यावर आहेत मात्र चांद्रयान लँडिंगवेळी ते इस्रोसोबत थेट कनेक्ट होणार आहेत.