Viral Burger King Employee: कामाच्या प्रती प्रमाणिक असला तर या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळतेच. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. एका व्यक्तीने 27 वर्ष एकदाही सुट्टी न घेता काम केले. या कामाचे फळ मिळून तो करोडपती झाला आहे. आपण नोकरी करत असताना किंवा एखादा व्यवसाय करत अशताना मुड फ्रेश होण्यासाठी सुट्टीची आवश्यकता असतेच. जेणेकरुन पुन्हा जॉइन होताना आपला मुड एकदम फ्रेश असेल. मात्र अमेरिकेत बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने एकदाही ब्रेकन घेता सलग 27 वर्षे काम केले आहे.
बर्गर किंगमध्ये सलग 27 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव केविन फोर्ड असं आहे. केविनला त्याने केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून ३ कोटी रुपये मिळाले आहेत. केविनच्या या कामाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. केविन लास वेगासमध्ये मॅकरान आंतरराष्ट्रीय विमानतळावर कॅशियर आणि कुक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बर्गर किंगमध्ये काम करत असताना त्यांना 27 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तांना एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओत फोर्डला त्याच्या कंपनीकडून काही भेटवस्तू मिळाल्या होत्या. यात एक मुव्ही तिकिट, कँडी, पेन, किचेन आणि एक स्टारबक्सचा कप यांचा समावेश आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सने कंपनीला अनेक सल्ले दिले होते. फोर्डला कंपनीने दिलेल्या भेटवस्तू स्वस्त असल्याचे युजर्सचं म्हणण होतं. यानंतर फोर्डची मुलगी सेरेना हिने GoFundMe पेजवर लिहलं होतं की, माझ्या वडिलांनी एक सिंगल फादर म्हणून मला वाढवलं. 27 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची कस्टडी त्यांना मिळाली होती. जसा जसा काळ बदलला तेव्हा त्यांनी दुसरं लग्न केले. हेल्थ इन्शुरन्ससाठी त्यांनी तिथे काम करणं सुरुच ठेवले. त्याचमुळं आम्हाला पूर्ण हेल्थ कव्हरेजसोबतच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले, असं तिने पोस्टमध्ये लिहलं आहे.
माझ्या वडिलांनी तिथे काम करणे सुरुच ठेवलं कारण ते अजूनही तरुण दिसतात. त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय जवळ आले आहे. आम्ही कोणाकडूनही पैसे मागत नाहीत. तर, आम्हाला पैशांची अपेक्षाही नाही. पण जर कोणाला आम्हाला आशीर्वाद द्यायचा असेल तर ते देऊ शकतात. ते आपल्या नातवंडाना भेटण्यास उत्सुक आहेत, असं फोर्ड यांच्या मुलीने म्हटलं आहे. या पोस्टनंतर फोर्डच्या पेजवर जवळपास 422,185 डॉलर म्हणजे साडे तीन कोटींची संपत्ती जमा झाली आहे.